शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भिमा येथे दगडफेकीत रोहणादेवीचा तरुण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:34 IST

कोरेगाव भिमा येथे शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेला दिग्रस तालुक्यातील रोहणादेवी येथील तरुण दगडफेकीत गंभीर जखमी झाला आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.

ठळक मुद्देमृत्युशी झुंज : पुण्याच्या ससून रुग्णालयात मेंदूवर शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरेगाव भिमा येथे शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेला दिग्रस तालुक्यातील रोहणादेवी येथील तरुण दगडफेकीत गंभीर जखमी झाला आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.अमित परशराम भोंगाडे (२१) रा. रोहणादेवी असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो रोहणादेवी आरपीआय शाखेचा प्रमुख आहे. दहा-बारा तरुणांना सोबत घेऊन तो कोरेगाव भिमा येथे अभिवादन करण्यासाठी गेला होता. मात्र त्या ठिकाणी झालेल्या दगडफेकीत तो गंभीर जखमी झाला. एका पेट्रोल पंप चालकाने त्याला पुण्याजवळील शिक्रापूर रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्याच्या मेंदूवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या दगडफेकीत त्याचा आतेभाऊ अविनाश घुलेराव रा. रोहणादेवी हाही जखमी झाला.तो दिग्रस येथे पोहोचला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. पुणे येथील महानगरपालिका आरपीआयचे उपाध्यक्ष डॉ. धेंडे व सामाजिक कार्यकर्ते कांबळे अमितच्या प्रकृतीकडे लक्ष ठेऊन आहेत. तर दिग्रस येथून त्याच्या मदतीसाठी सात ते आठ तरुण जात असल्याची माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.