शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

पुसद शहरात रस्त्यांची चाळणी

By admin | Updated: July 8, 2017 00:33 IST

राज्याला दोन मुख्यमंत्री आणि सातत्याने मंत्री देणाऱ्या पुसद शहरातील रस्त्यांची अवस्था एखाद्या खेड्यालाही लाजवेल अशी झाली आहे.

नगरपरिषदेचे दुर्लक्ष : नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : राज्याला दोन मुख्यमंत्री आणि सातत्याने मंत्री देणाऱ्या पुसद शहरातील रस्त्यांची अवस्था एखाद्या खेड्यालाही लाजवेल अशी झाली आहे. शहरातील रस्त्यांची चाळणी झाली असून अनेक रस्त्यांवर पाऊस आला की तळे साचते. रस्त्यावरून जाताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असून नगरपरिषद मात्र दुर्लक्ष करीत आहेत. पुसद शहर राजकीयदृष्ट्या जागरूक शहर म्हणून ओळखले जाते. शहराने तब्बल दोन मुख्यमंत्री राज्याला दिले. अनेक वर्ष पुसदने मंत्रिपद भूषविले. आता त्याच घराण्यातील व्यक्ती पुसदच्या नगराध्यक्षपदी विराजमान आहे. परंतु शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे. नाईक चौक ते मुखरे चौकादरम्यान रस्त्यावर तुकारामबापू वॉर्डानजीक मोठ्ठाले खड्डे पडले आहे. येथील नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. नाली नसल्याने संपूर्ण पाणी रस्त्यावर साचते. पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप येते. शहरातील तहसील कार्यालय, नगरपरिषद, पोस्ट आॅफिस, शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ, शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी हाच मार्ग आहे. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. परंतु खड्डे बुजविण्याचे सौजन्य नगरपरिषदेने दाखविले नाही. वारंवार अपघात घडत असून अनेकांना ईजाही होत आहे. येथील दूरदर्शन केंद्र ते तीन पुतळा परिसरात मोठ्ठाले खड्डे पडले आहे. येथेही अपघाताची शक्यता वाढली आहे. जाजू हॉस्पिटल ते शंकरनगर, रामनगरकडे जाणारा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. लहानसहान खड्डे चुकविले जावू शकते. परंतु काही भागात दीड-दीड फुटांचे खड्डे पडले आहे. यात पाणी साचल्यानंतर रात्री वाहनधारकाला खड्डा दिसत नाही.