चौकाचौकात फळ विक्रेत्यांची दुकानेकिराणा दुकानदाराने अंतरासाठी बांधली दोरीग्रामीण भागात काट्या टाकून रस्ते अडविलेबाहेरून येणाऱ्यांकडे संशयाची नजरभिक्षेकऱ्यांच्या भोजनासाठी सरसावले कार्यकर्तेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू झाली. रस्ते सामसूम व नागरिक घामाघूम झाले. मात्र काही व्यक्ती नियमांचे उल्लंघन करतात. अशा ५९ नागरिकांवर पोलीस प्रशासनाने फौजदारी कारवाई केली आहे.संचारबंदी असताना अनावश्यक कामे टाळण्याच्या सूचना आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना आहे. मात्र जिल्ह्यातील काही नागरिक या सूचना पाळत नाहीत. कुठलेही काम नसताना गावात वेगाने वाहन चालवितात. अनेक ठिकाणी गोंधळ करीत आहेत. अशा व्यक्तींना प्रथम समज दिल्यानंतरही त्या व्यक्तींनी दुरूस्ती केली नाही. अशा व्यक्तींवर दंडुके बरसविण्याचे काम पोलीस करीत आहेत. काही दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत. या विक्रेत्यांनी नियम मोडून दुकाने उघडली. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना अंतर ठेवण्याच्या सूचना आहे. या नियमांचे पालन होत नाही म्हणून किराणा व्यावसायिकांनी दुकानात मुख्य काऊंटरच्या समोरच दोरी बांधली आहे. यामुळे आपसूकच अंतर वाढले आहे.दुकानातील किराणा संपत असल्याने काही व्यावसायिकांनी धान्य भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यातून मु्ख्य बाजारपेठेत ठोक विक्रेत्यांकडे गर्दी पहायला मिळते.स्वत:च्या संरक्षणासाठी मास्क खरेदी वाढली आहे. मास्क विक्रीची दुकाने बुधवारी शहरात पहायला मिळाली. या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होती. मात्र दुपारनंतर बाजारपेठेत शुकशुकाट होता. विविध ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पहायला मिळाला. गल्ली-बोळातून पोलिसांची वाहने फिरत होती. त्यावर सूचना प्रसारित केल्या जात होत्या. तरीही काही हवसे बाहेर फिरत होते.दूध आणि भाजीपाला गावातच विकणारसंचारबंदी असल्याने ग्रामस्थांनी गावातील दूध आणि भाजीपाला गावातच विकण्याचा निर्णय घेतला आहे. जामडोह गावाने हा निर्णय जाहीर केला आहे. तर जामवाडीमध्ये दूध विक्रेत्यांनी गावातच दूध विकण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. भाजीपाला उत्पादक गावात भाजीपाला नेण्यासाठी वाहने मिळत नाही, यामुळे शेतकºयांनी गावतच भाजीपाला विकणे सुरू केले आहे. यामुळे भाजीमंडीकडे येणारा भाजीपाला थांबला आहे.
कोरोनाच्या भीतीने यवतमाळातील रस्ते सामसूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST
संचारबंदी असताना अनावश्यक कामे टाळण्याच्या सूचना आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना आहे. मात्र जिल्ह्यातील काही नागरिक या सूचना पाळत नाहीत. कुठलेही काम नसताना गावात वेगाने वाहन चालवितात. अनेक ठिकाणी गोंधळ करीत आहेत. अशा व्यक्तींना प्रथम समज दिल्यानंतरही त्या व्यक्तींनी दुरूस्ती केली नाही. अशा व्यक्तींवर दंडुके बरसविण्याचे काम पोलीस करीत आहेत.
कोरोनाच्या भीतीने यवतमाळातील रस्ते सामसूम
ठळक मुद्देनियम मोडणाऱ्या ५९ जणांवर कारवाईनियम मोडणाऱ्या नागरिकांना दंड्यांचा प्रसाददत्त चौकात भाजी विक्रेत्यांनी ठेवले अंतरमास्क खरेदीसाठी महिलांनीही केली गर्दी