शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुसदचे रस्ते झाले मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:59 IST

शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते नाईक बंगला रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमण बुधवारी हटविण्यात आले. यामुळे या रस्त्याने तूर्तास मोकळा श्वास घेतला. या मार्गावर अनेक दुकानदारांनी अतिक्रमण करून रस्त्याची कोंडी केली होती.

ठळक मुद्देअतिक्रमण हटाव : शिवाजी चौक ते बंगल्यापर्यंत मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते नाईक बंगला रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमण बुधवारी हटविण्यात आले. यामुळे या रस्त्याने तूर्तास मोकळा श्वास घेतला.या मार्गावर अनेक दुकानदारांनी अतिक्रमण करून रस्त्याची कोंडी केली होती. या अतिक्रमणावर बुधवारी बुलडोझर चालविण्यात आला. शहरातून यवतमाळकडे राज्य मार्ग जातो. या मार्गावर महात्मा फुले चौक, बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी चौक आदी ठिकाणी अनेक दुकानदारांनी आपली दुकाने थाटून अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा वाहतूक शाखा व नगर परिषदेने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या मार्गावरील जवळपास शंभर अतिक्रमणे हटविण्यात आल्याने या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. अतिक्रमण हटाव मोहीमेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश झळके, अभियंता ए.आर. राठोड व त्यांचे पथक, नगरपरिषद आरोग्य विभागाचे निरीक्षक सुभाष राठोड, बांधकाम विभागाचे अभियंता दिनेश राठोड, महावितरणचे साहेबराव भुरके व त्यांचे पथक, जिल्हा पोलीस वाहतूक शाखेचे एपीआय धीरज चव्हाण व त्यांचे पथक सहभागी होते. रस्ता रुंदीकरण व सिमेंटीकरण होणार असल्याने अतिक्रमण हटविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. आता नागरिकांना रस्त्याच्या सिमेंटीकरणाची प्रतीक्षा आहे.नोटीस देऊनही तसदी नाहीसर्व दुकानदारांना दोन दिवसांपूर्वीच अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढण्याची कोणतीही तसदी घेतली नाही. त्यामुळे बुधवारी अखेर फुटपाथवरील अतिक्रमणावर थेट बुलडोझर चालविण्यात आला.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण