शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

रस्ता झाला मोकळा

By admin | Updated: June 16, 2016 02:53 IST

तालुक्यातील सोनापूर येथील १०० वर्षे जुना असलेला रस्ता अखेर महसूल विभागाने अतिक्रमणातून मोकळा करून दिला.

वणी : तालुक्यातील सोनापूर येथील १०० वर्षे जुना असलेला रस्ता अखेर महसूल विभागाने अतिक्रमणातून मोकळा करून दिला.रेकॉर्डवर व वहितीत असलेला रस्ता बंद करण्याकरिता २०१४ मध्ये तलाठी राजहंस वरठे यांनी खोटा अहवाल सादर करून तत्कालीन नायब तहसीलदार देवराव आसुटकर यांच्याकडे दिला. त्यांनी अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन रेकॉर्डचा रस्ता बंद करण्याचे आदेश पारित केले होते. सदर आदेशाविरूद्ध मधुकर देठे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपिल दाखल केले होते. त्यानंतर एक वर्ष उपविभागीय कार्यालयातर्फे चौकशी सुरू होती. गेल्या २१ नोव्हेंबर २०१५ ला उपविभागीय अधिकाऱ्यांनी देवराव आसुटकर यांचे आदेश रद्द करून रेकॉर्डच्या बाजूने निर्णय दिला. नंतर रमेश खाडे यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल सादर केले होते. ते खारीज करून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी २२ एप्रिल २०१६ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला व रेकॉर्डचा रस्ता मोकळा करण्याचा मार्ग सुकर केला. नंतर नायब तहसीलदार एस.आर. शेख, मंडळ अधिकारी जयंत झाडे, ज.जी. राजगुरे, कुमाड, तलाठी सी.एम. मडावी यांनी मोजमाप करून २१ फुटांचा हा रस्ता मोकळा करून दिल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्याची सुविधा झाली. (कार्यालय प्रतिनिधी)