शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून करणार रस्त्याची दुरूस्ती

By admin | Updated: June 15, 2017 01:05 IST

तालुक्यातील पाटणबोरी येथील मुख्य रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून या रस्त्याची दुरुस्ती होणार तरी केव्हा,

‘प्रहार’चे अभिनव आंदोलन : पाटणबोरी येथील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : तालुक्यातील पाटणबोरी येथील मुख्य रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून या रस्त्याची दुरुस्ती होणार तरी केव्हा, असा प्रश्न पाटणबोरीवासियांनी उपस्थित केला आहे.या बाबत नागरिकांनी अनेकदा सबंधिताकडे तक्रारी केल्या. परंतु त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. येत्या चार दिवसांत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले नाही तर ग्राहक प्रहार संघटनेतर्फे अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. गावकऱ्यांकडूनच वर्गणी करुन या रस्त्याची दुरुस्ती ग्राहक प्रहार संघटनेतर्फे करण्यात येईल अशी माहिती प्रसाद नावलेकर यांनी दिली. पाटणबोरी हे गाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून या गावाची लोकसंख्या जवळपास १२ हजारांच्या आसपास आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या गावात जाण्यासाठी एकमुख्य रस्ता आहे. मागील कित्येक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था खराब आहे. परंतु आता तर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे खड्डयांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. या रस्त्याने ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी पाटणबोरी येथील रहिवाशांनी अनेकदा ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे लेखी निवेदन दिले. परंतु कोणीही याकडे लक्ष दिले नाही. ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्यास या रस्त्याचे काम आमच्याकडे नाही, असे सांगितले जाते. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याकडे गेले तर ते दुरुस्तीचे काम आमच्याकडे नाही, असे सांगतात. पाटणबोरी येथील या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे पाटणबोरीवासियांमध्ये असंतोष आहे. पांढरकवडा येथील ग्राहक प्रहार संघटनेने ग्रामपंचायत पाटणबोरी, पंचायत समिती पांढरकवडा व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली असून येत्या चार दिवसांत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा गावातील नागरिकांकडून वर्गणी गोळा करुन आम्हीच या रस्त्याची दुरुस्ती करु असा इशारा दिला आहे.