शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाने रस्ते अरुंद

By admin | Updated: January 23, 2017 01:10 IST

शहरात मुख्य रस्त्यासह इतर मार्गावर अतिक्रमण वाढत असून यामुळे रस्ते अरुंद होत आहे.

वाहतुकीचा बोजवारा : अतिक्रमण हटाव मोहिमेचा पत्ताच नाही पुसद : शहरात मुख्य रस्त्यासह इतर मार्गावर अतिक्रमण वाढत असून यामुळे रस्ते अरुंद होत आहे. वाहतुकीची कोंडी नित्याची बाब झाली असून गेल्या वर्षभरापासून अतिक्रमण हटाव मोहीम मात्र राबविण्यात आली नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातात वाढ झाली आहे. पुसद शहराच्या विस्ताराबरोबर दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न जटील झाला आहे. शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक, गांधी चौक ते सुभाष चौक, शिवाजी चौक ते सुभाष चौक हा मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरच फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते हातगाड्या उभ्या करतात. आॅटोरिक्षा चालक, धान्य खरेदी करणारे व्यापारी, मालवाहतूक करणारी वाहने आपली वाहने उभी करतात. त्यामुळे वारंवार रहदारीस अडथळा निर्माण होतो. वाहनधारकांना या रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागते. मुख्य रस्त्यावर बाजारपेठ, तहसील कार्यालय, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, बँका असल्याने प्रचंड वर्दळ असते. काही रस्त्यावर सकाळपासून रात्रीपर्यंत माल वाहतूक करणारी वाहने उभी असतात. शिवाजी चौक ते बसस्थानकाजवळी रस्त्यांवर अवैध वाहतूकदारांचा ठिय्या असतो. प्रवासी भरण्यासाठी आॅटोरिक्षा आणि चारचाकी वाहनांची चढाओढ सुरू असते. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते. रविवारी आठवडी बाजार असल्याने या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नसते. आठवडी बाजारात तर पायी चालणे देखील कठीण होते. बसस्थानक परिसर, शिवाजी चौक ते डॉ. आंबेडकर चौक, गांधी चौक ते सुभाष चौक हा मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. पुसद येथे राज्य परिवहन महामंडळाचे आगार असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून बसेस येतात. परंतु वाहतुकीच्या कोंडीमुळे या बसेस अडकून पडत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. परंतु पुसद शहरात मात्र अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढले आहे. नगरपालिका व महसूल विभागाने या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी) ४७ धार्मिक स्थळांचे निष्कासन अटळ उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी असलेली धार्मिक स्थळे निष्कासीत करण्याचे आदेश असून पुसद शहरातील तब्बल ४७ धार्मिक स्थळांना मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी नोटीस बजावल्या आहेत. ५ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार नगरपरिषद क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासीत करावी याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. परंतु प्रकरण न्यायालयात गेले होते. तेथे स्थगिती मिळाली. परंतु आता उच्च न्यायालयाने राज्य शासनाला आदेश दिल्याने ही कारवाई अटळ आहे. पुसद शहरातील ४७ अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे.