शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

शिक्षणाचा रस्ता अडला

By admin | Updated: August 28, 2016 00:16 IST

दळणवळणाची अत्याधुनिक साधने निर्माण झालेली असतानाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवासाकरिता अडचण जात आहे

बस चालू करा : १५ गावांतील विद्यार्थ्यांचा टाहोउमरखेड : दळणवळणाची अत्याधुनिक साधने निर्माण झालेली असतानाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवासाकरिता अडचण जात आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या तब्बल १५ गावातील विद्यार्थ्यांचा मार्गच बसफेरीविना बंद झाला आहे. त्यामुळे उमरखेड ते चातारी बसफेरी चालू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तालुक्यातील अनेक गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उमरखेड येथील महाविद्यालयामध्ये दररोज जाणे-येणे करावे लागते. मात्र उमरखेड ते चातारी ही बससेवा नसल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उमरखेड आगाराने तत्काळ ही बसफेरी सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. उमरखेडला येण्यासाठी तत्काळ बस सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ब्राह्मणगाव, चातारी, परजना, सिंदगी, मानकेश्वर, कोपरा, बोरी, हरदडा, सोईट आदी गावांतून शेकडो विद्यार्थी दररोज उमरखेडला शिक्षणासाठी जाणे-येणे करतात. उमरखेड ते चातारी ही बसफेरी सुरू झाल्यास त्यांच्या शिक्षणातील मोठा अडसर दूर होणार आहे. या बसफेरीसाठी विद्यार्थ्यांनी या पूर्वीही दोनवेळा लेखी निवेदन दिले. सोबतच परिसरातील सर्व गावांमधील ग्रामसभांनीही याबाबत ठराव दिले आहे. तरीही उमरखेड आगाराकडून बसफेरी सुरू करण्याबाबत दिरंगाई केली जात आहे. अखेर शनिवारी दुपारी ४ वाजता मोठ्या संख्येत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उमरखेड आगार प्रमुखांच्या कार्यालयात धडक दिली. आगार प्रमुख जयेश आठवले व सहायक वाहतूक अधीक्षक एस.डी. नाटकर यांची भेट घेवून आपली समस्या मांडली. बसफेरी सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा लेखी निवेदनही दिले. ब्राह्मणगाव येथे डीएड कॉलेज व कृषी विद्यालय आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. बसफेरी सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी श्रीहरी मोरे, माधव मटके, नीलेश वाठोरे, शुभम गोरे, आकाश धोंगरकर, ओंकार साळेकर, अक्षय शिंदे, एकनाथ लांडे, ओंकार वानखेडे, संदीप राठोड, वैभव खडसे, वैष्णवी वंजारे, अश्विनी जगदेकर, वर्षा गाडेकर, पूजा वाघमारे, सूरज मोरे, जमीन खान पठाण, शैलेश विणकरे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)गुणवत्तेला मार्ग मोकळा करागेल्या काही वर्षात उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात राज्यस्तरावर दिमाखदार कामगिरी केली आहे. गरिबी आणि इतर अडचणींवर मात करीत स्पर्धा परीक्षांमध्येही या विद्यार्थ्यांची चुणूक दिसून आली. विशेषत: बंदीभागातील विद्यार्थ्यांनी तालुक्याचा मोठा नावलौकिक केला. रवींद्र राठोड या विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पद पटकावले, तर रेखा खडतकर या विद्यार्थिनीने कोणतेही आर्थिक स्थैर्य नसताना एमबीबीएसपर्यंत मजल मारली. या दोन्ही ताज्या उदाहरणांमुळे तालुक्याची मान उंचावली आहे. मात्र अशा अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आपल्या गावातून महाविद्यालयापर्यंत जाण्यासाठी साधी बससेवा सुरू करण्याचे सौजन्यही दाखवायला आगार प्रमुख तयार नाही. त्यामुळे रोष व्यक्त होत आहे.