शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठच्या शेतांना धोका

By admin | Updated: June 8, 2014 00:11 IST

तालुक्यातून वाहणार्‍या वर्धा व पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदी काठावरील गावांतील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते. पुराचे पाणी शेतात शिरून शेती खरडून गेल्याने त्यांचे हिरवे स्वप्न कोमेजते.

वणी : तालुक्यातून वाहणार्‍या वर्धा व पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदी काठावरील गावांतील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते. पुराचे पाणी शेतात शिरून शेती खरडून गेल्याने त्यांचे हिरवे स्वप्न कोमेजते. त्यामुळे बळीराजा देशोधडीला लागतो. त्या मोबदल्यात शासनाकडून तुटपुंजी मदत मिळत असल्याने त्यांची एकप्रकारे चेष्टाच होते.वर्धा, पैनगंगा नदीच्या खोर्‍यात मोठय़ा प्रमाणात खनिज साठा उपलब्ध आहे. त्यात दगडी कोळसा मोठय़ा प्रमाणात आहे. परिणामी तालुक्यात कोळशाच्या खुल्या व भूमिगत खाणी तयार झाल्या आहेत. या खाणीतील मातीचे ढिगारे नदी काठालगत टाकण्यात आल्याने ते पावसाळय़ात ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरतात. मातीच्या ढिगार्‍यांमुळे पुराचे पाणी गावात शिरते. ते शेतातही पसरते. त्यामुळे शेतातील पीक पूर्णत: पाण्याखाली येते. पाण्यामुळे ते पिवळे पडून जागीच सडते. त्यात शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते. त्यांना आर्थिक फटका बसतो.  या पुरामुळे शेतकर्‍यांच्या हिरव्या स्वप्नावरच पाणी फेरले जाते. वर्धा, पैनंगगा नदी व निगरुडा नदी तसेच नाल्यांना पूर आल्यास या शेतपिकांचे नुकसान होते. नाल्यांचे पाणी पुढे सरकत नसल्याने ते शेतात शिरते. त्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान होते. परिणामी रखरखत्या उन्हात घाम गाळून मशागत करून तयार केलेली शेतजमीन पुरामुळे खरडून जाते. पूर नैसर्गिक असतो. मात्र वेकोलिच्या मातीच्या ढिगार्‍यांनी आडकाठी आणून नदी व नाल्यांना वळण दिल्याने पुराचा धोका वाढतो. तथापि वेकोलि शेतकर्‍यांना मदत करण्यास पुढाकार घेत नाही. प्रदूषणामुळे शेत पिकांचे नुकसान झाले, तरी वेकोलि पुरेशी मदत करीत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)