शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त झालेल्या बालकांना ‘एमएसआयसी’ आजाराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका होतो. यामध्ये मुलांना खूप ताप येतो. पाच दिवसांपर्यंत हा ताप कमी होत नाही. मुलांचे डोळे लाल होतात. त्वचेवर रॅशेस पडतात. लहान मुलांना मळमळ होते, उलट्या होतात. याशिवाय सतत पोट दुखते. अशा स्वरूपाच्या लक्षणांना एमएसआयसी असे म्हणतात. अशा प्रकारची लक्षणे दिसताच डाॅक्टरांशी संपर्क साधून पुढील उपचारासाठी पालकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यात सहा बालकांची नोंद : कोरोनाबाधितांना उपचारानंतर सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचा निर्वाळा आरोग्य यंत्रणेने दिला आहे. जिल्ह्यात सहा बालकांना कोरोना झाल्याचे निदान आरोग्य यंत्रणेने केले आहे. या बालकांवर उपचार झाल्यानंतर सुटी देण्यात आली आहे. सध्या अशा स्वरूपाचे रुग्ण जिल्ह्यात नाहीत. मात्र, प्रत्येक पालकाला खबरदारी घ्यावी लागणार आहे. कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका होतो. यामध्ये मुलांना खूप ताप येतो. पाच दिवसांपर्यंत हा ताप कमी होत नाही. मुलांचे डोळे लाल होतात. त्वचेवर रॅशेस पडतात. लहान मुलांना मळमळ होते, उलट्या होतात. याशिवाय सतत पोट दुखते. अशा स्वरूपाच्या लक्षणांना एमएसआयसी असे म्हणतात. अशा प्रकारची लक्षणे दिसताच डाॅक्टरांशी संपर्क साधून पुढील उपचारासाठी पालकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात सर्दी, खोकला या स्वरुपाचे आजार लहान मुलांना जाणवतात. अशा स्वरुपाची लक्षणे दिसताच बालकांना डाॅक्टरांकडे दाखवावे, यामुळे पुढील उपचार सुलभ होण्यास मदत होते.  

जिल्ह्यात सहा बालकांना कोरोनाकोरोना झाल्यानंतर निगेटिव्ह झालेले बालक वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार करून सुटी देण्यात आली. आतापर्यंत सहा बालकांची नोंद झाली.  

ही घ्या काळजी

लहान मुलांना शक्यतो बाहेर घेऊन जाऊ नये. बाहेर जाताना मास्क लावूनच बाहेर पडावे, याची खबरदारी पालकांनी घ्यावी. 

लक्षणे दिसताच तातडीने डाॅक्टरांना दाखवावे. यामुळे मुलांवर उपचार करणे सोपे होईल आणि पुढील त्रास टाळता येईल. लहान मुलांना कोरोनाची बाधा मुख्यत: मोठ्या व्यक्तींकडूनच होते. यामुळे घरातील मोठ्या व्यक्तींनी कोरोना नियमांचे पालन करावे. आपल्या मुलांना सुरक्षित ठेवावे. 

लहान बालकांसाठी शंभर बेडची व्यवस्थातिसऱ्या लाटेत लहान बालकांना कोरोना होण्याचा धोका आहे. हा धोका लक्षात येता स्त्री रुग्णालयात ४० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, तर तीन उपजिल्हा रुग्णालयात ६० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.  - डाॅ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्सक, यवतमाळ 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या