शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धोका माहीत आहे, पण प्रश्न रोजीरोटीचा आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:15 IST

‘जीवाला धोका आहे, हे आम्हाला कळत नाही का? पण प्रश्न पोटाचा आहे. पाठीवर पंप घेऊन विषाची फवारणी करत मृत्यूच्या दारात उभे असतो’ हे वास्तव शेतशिवारात कीटकनाशकांची फवारणी करणाºया शेतमजुरांचे आहे.

ठळक मुद्देकुटुंब उघड्यावर : फवारणीत सहा शेतमजुरांचा बळी

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘जीवाला धोका आहे, हे आम्हाला कळत नाही का? पण प्रश्न पोटाचा आहे. पाठीवर पंप घेऊन विषाची फवारणी करत मृत्यूच्या दारात उभे असतो’ हे वास्तव शेतशिवारात कीटकनाशकांची फवारणी करणाºया शेतमजुरांचे आहे. जिल्ह्यात फवारणीमुळे १९ जणांचा बळी गेला असून त्यात सहा शेतमजुरांचा समावेश आहे. पोटासाठी जीव गमावलेल्या या शेतमजुरांचे कुटुंब मात्र उघड्यावर आले आहे.यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखला जातो. परंतु गत दोन महिन्यांत या जिल्ह्याची नवी ओळख कीटकनाशक फवारणीच्या बळींमुळे होत आहे. १९ जणांचा प्राण गेला असून शेकडो शेतकरी आणि शेतमजूर मृत्यूच्या उंबरठ्यातून परतले आहे. यवतमाळ जिल्ह्यात गत काही वर्षांपासून फवारणीने विषबाधा होण्याचे प्रकार वाढले आहे. परंतु यंदा या फवारणीने कहरच केला. विविध कारणांनी फवारणी शेतकºयांच्या जीवावर उलटली. यात शेतकºयाच्या कामाला गेलेल्या शेतमजुराचाही बळी गेला आहे. जिल्ह्यात सहा मजुरांचा फवारणीने बळी घेतला. त्यात कळंब येथील देवीदास रामाजी मडावी, घाटंजी तालुक्यातील कुर्लीचा रमेश येरन्ना चिल्लरवार व मानोलीचा बंडू चंद्रभान सोनुले, मारेगाव येथील वसंत केशव सिडाम, दारव्हा तालुक्यातील उचेगावचा रवी धन्नू राठोड यांचा समावेश आहे.फवारणीसाठी आता शासकीय पातळीवर मार्गदर्शन केले जाते. विविध माध्यमातून शेतकरी आणि शेतमजुरांना फवारणी कशी करावी, हे सांगितले जाते. परंतु शेतातील वास्तव वेगळेच आहे. अनेक शेतमजूर म्हणतात, आम्ही यंदाच फवारणी करत नाही. कित्येक वर्षांपासून हेच काम करतो. परंतु असा प्रकार कधीच झाला नाही. सुरक्षेच्या साधनांचे काय? शेतकºयाजवळच गॉगल आणि हातमोजे नसतात.मग आमच्या मजुराकडे येणार तरी कसे? जीवाला धोका आहे, पण प्रश्न पोटाचा आहे, असा थेट सवालच शेतमजूर करतात. शासनाने गांभीर्याने हा विषय घेतला. सर्वांना मदतही घोषित केली. परंतु या मदतीत त्यांचे होणार तरी काय? ज्यांच्याकडे शेतीचा थोडा तरी तुकडा आहे, ते कसेतरी जगतील.परंतु ज्या शेतमजुरांचा चरितार्थच कुटुंबप्रमुखावर होता, त्याचाच फवारणीने बळी घेतला. त्यामुळे अख्खे कुटुंब उघड्यावर आले. दोन लाख रुपये किती दिवस पुरतील? मुलांच्या व कुटुंबाच्या पुनर्वसनाचा कायमस्वरूपी तोडगा शासनाने काढावा, अशी विनंती आता बळी ठरलेल्या शेतमजुरांचे कुटुंबीय करीत आहे.पहिला मृत्यू कळंबमध्येकीटकनाशकाच्या फवारणीत पहिला बळी ठरला तो कळंब येथील शेतमजूर देवीदास रामाजी मडावी. शेतात फवारणी करताना विषबाधा झाली. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र १९ आॅगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला. यानंतर जिल्ह्यात पाठोपाठ १९ शेतकरी-शेतमजुरांचे बळी गेले. या सर्वांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांची मदत देण्यात आली. परंतु ही मदत अतिशय तुटपुंजी आहे.कीटकनाशकांचा शरीरावर दीर्घकालीन परिणामजिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीने ४०० च्या वर शेतकरी-शेतमजूर मृत्यूच्या दाढेतून परत आले. घामावाटे त्यांच्या शरीरात विष भिनले. उपचार करून ही मंडळी आता आपल्या गावी गेली आहे. परंतु या कीटकनाशकांचे काही अंश त्यांच्या शरीरात असण्याची शक्यता आहे. कीटकनाशकांचा दीर्घकालीन परिणाम या शेतकरी-शेतमजुरांवर होण्याची शक्यता आहे. शासकीय पातळीवर केवळ फवारणीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. मात्र विषबाधा झाल्यानंतर बाधितांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत कुणी काहीच सांगत नाही. विषबाधित शेतकरी मानसिकदृष्ट्या खचले असून त्यांच्या समुपदेशनाचीही गरज आहे.