शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सूत्रधारांच्या मुसक्या आवळा

By admin | Updated: September 22, 2016 01:50 IST

शहरात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सातत्याने समाजकंटकांकडून विविध घटना घडवून आणल्या जातात.

जमाते इस्लामी हिंद : जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटले शिष्टमंडळउमरखेड : शहरात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सातत्याने समाजकंटकांकडून विविध घटना घडवून आणल्या जातात. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने जातीय तेढ निर्माण करू पाहणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेवून त्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी जमाते इस्लामी हिंदच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडे बुधवारी केली.उमरखेड शहरात १५ सप्टेंबर रोजी उसळलेल्या दंगलीत शहरातील काही दुकानांना आगी लावून सामान्य व्यापारीवर्गाचे मोठे नुकसान करण्यात आले. ही बाब अतिशय निंदनीय आहे. काही समाजकंटकांमुळे संपूर्ण सभ्य समाजाला त्रास सहन करावा लागतो. अशा लोकांना वेळीच जेरबंद करण्याची गरज आहे. शहरातील नृसिंह आॅटोमोबाईल्स, ममता जनरल स्टोअर्स, खजाना साडी सेंटर, कय्यूम किराणा, निसार किराणा, कुरेशी कॉम्प्युटर या दुकानांची तोडफोड झाली. यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले. पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करून खऱ्या सूत्रधारांना अटक केल्यास शहरात अशा घटना वारंवार घडणार नाही, असेही जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच नुकसानग्रस्त गोरगरीब दुकानदारांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.यावेळी जमाते इस्लामी हिंद संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ.हकीम शेख, मुव्हमेंट फॉर पीस अ‍ॅन्ड जस्टीसचे राज्य सचिव मो.अलताफ हुसेन, नांदेड शहराध्यक्ष मोईर्जूरहमान, असोसिएशन फॉर प्रोटेक्ट सिव्हिल राईटचे जिल्हाध्यक्ष इम्तेयाज खान, एमपीजेचे जिल्हाध्यक्ष इब्राहीम खान मजीद खान, अ‍ॅड.नसरूल्लाह खान, रऊफ नहवी, फिरोज अन्सारी, महेमूद जनाब, राहत अन्सारी, साकीब एकबाल, खलिद शेख आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. (शहर प्रतिनिधी)