शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मीना बाजारमध्ये महसूल अधिकाऱ्याची भागीदारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST

आझाद मैदानात गेल्या अनेक वर्षांपासून मीना बाजार भरविला जातो. परंतु विशिष्ट व्यक्तींनाच त्याचे कंत्राट मिळतात. नाममात्र रकमेत दोन महिन्यांसाठी ही जागा किरायाने घेतली जाते. वास्तविक या बाजारातून लाखो रुपयांची कमाई केली जाते. प्रत्येक वर्षी ठरलेल्या व्यक्तींनाच मीना बाजार कसा काय मिळतो याच्या खोलात शिरले असता महसूल अधिकाºयाच्या अघोषित भागीदारीचे ‘पित्तर’ उघडे पडले.

ठळक मुद्देअनेक वर्षे महसूल बुडविला : मर्जीतील व्यक्तीसाठी स्थानिकांवर दबाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील आझाद मैदानात गेल्या अनेक वर्षांपासून थाटल्या जाणाऱ्या मीना बाजारात चक्क एका महसूल अधिकाºयाचीच भागीदारी असल्याचा खळबळजनक प्रकार चर्चिला जात आहे. हा अधिकारी अलिकडेच सेवानिवृत्त झाला असला तरी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांनाच मीना बाजार मिळावा म्हणून अजूनही स्थानिक महसूल अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे बोलले जाते.आझाद मैदानात गेल्या अनेक वर्षांपासून मीना बाजार भरविला जातो. परंतु विशिष्ट व्यक्तींनाच त्याचे कंत्राट मिळतात. नाममात्र रकमेत दोन महिन्यांसाठी ही जागा किरायाने घेतली जाते. वास्तविक या बाजारातून लाखो रुपयांची कमाई केली जाते. प्रत्येक वर्षी ठरलेल्या व्यक्तींनाच मीना बाजार कसा काय मिळतो याच्या खोलात शिरले असता महसूल अधिकाºयाच्या अघोषित भागीदारीचे ‘पित्तर’ उघडे पडले.हा अधिकारी अनेक वर्ष जिल्ह्यात वेगवेगळ्या पदावर कार्यरत होता. काही वर्षांपूर्वी त्यांची अन्य जिल्ह्यात बदली झाली. तेथूनच ते सेवानिवृत्त झाले. स्थानिक प्रशासनाची दिशाभूल करून आतापर्यंत त्यांच्या मर्जीतील व्यक्तीला मीना बाजारचे कंत्राट मिळवून देण्यात त्यांना यश येत होते. जिल्ह्याबाहेर गेल्यानंतरही त्यांचा हा पराक्रम सुरूच होता. आता सेवानिवृत्त झाल्यानंतरही ते आपले प्रशासकीय वजन महसूलच्या स्थानिक अधिकाऱ्यावर फोनद्वारे वापरत असल्याचे सांगितले जाते. आजही त्यांचा आपल्या मर्जीतील ठरलेल्या व्यक्तींनाच मीना बाजारचा कंत्राट मिळावा यासाठी आग्रह आहे. परंतु यवतमाळचे उपविभागीय महसूल अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन मीना बाजारसाठी आझाद मैदान जाहीर लिलाव करून किरायाने देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. या प्रस्तावामुळे शासनाच्या महसुलात लाखो रुपयांची भर पडणार आहे. आतापर्यंत हा महसूल मीना बाजाराचे कंत्राट घेणाºयांच्या तिजोरीत जात होता. नफ्यातील या रकमेत त्या महसूल अधिकाऱ्यासह अनेक जण ‘वाटेकरी’ होते.धमकी दिल्याचीही चर्चागेल्या अनेक वर्षांपासून मर्जीतील व्यक्तींना मीना बाजारसाठी आझाद मैदान मिळावे म्हणून प्रशासकीय वजन वापरणाºया त्या महसूल अधिकाºयाला कुणी तरी धमकी दिल्याची चर्चा आहे. तुम्ही सेवानिवृत्त झाले, आझाद मैदान प्रकरणात आता हस्तक्षेप करू नये, अधिकारी बनूनच रहावे अशी समज दिली गेल्याचेही बोलले जाते. धमकी देणारा हा व्यक्ती नेमका कोण याचा शोध त्या अधिकाºयाकडून घेतला जात असल्याचेही समजते.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभाग