शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे ‘राजकारण’

By admin | Updated: June 6, 2014 00:13 IST

आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यातही यवतमाळ मतदारसंघ डोळ्यापुढे ठेऊन महसुली बदल्यांचे ‘राजकारण’ सुरू आहे. सुरुवातीला रोखठोक भूमिका घेणार्‍या प्रशासनालाही अखेर या राजकारणापायी नमते घ्यावे लागले.

यवतमाळ : आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यातही यवतमाळ मतदारसंघ डोळ्यापुढे ठेऊन महसुली बदल्यांचे ‘राजकारण’ सुरू आहे. सुरुवातीला रोखठोक भूमिका घेणार्‍या प्रशासनालाही अखेर या राजकारणापायी नमते घ्यावे लागले. त्या विरोधात आता मंडल अधिकार्‍यांनी थेट अमरावतीच्या महसूल आयुक्तांचा दरवाजा ठोठावला आहे. एका कर्मचारी नेत्याला विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे. या निवडणुकीत शासकीय यंत्रणेचाही गावागावात वापर करून घेण्याचा त्यांचा मनसुबा आहे. त्यासाठी यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील सर्व गावात आपल्या मर्जीतील महसूल कर्मचारी असावे, असा त्यांचा प्रयत्न आहे. या कर्मचार्‍यांच्या माध्यमातून त्या-त्या गावातील वजनी नेता कोण, तो कुणाचे ऐकतो, त्याच्या काय हालचाली आहेत, याची माहिती घेणे, त्याचा कल ओळखणे आणि आपल्यासाठी त्याला सकारात्मक करणे, त्याच्या माध्यमातून गावातील मतदारांचे ब्रेन वॉश करणे आदी जबाबदारी पार पाडली जाणार आहे. त्या पद्धतीने यावेळी महसूल कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जाणार होत्या. मात्र जिल्हा प्रशासनाला याची कुणकुण लागताच त्यांनी आपल्या पद्धतीने बदल्या करण्याचे ठरविले. त्यासाठी मंडल अधिकार्‍यांची ज्येष्ठता यादी लावली गेली. त्यांचा कार्यकाळ तपासून इतरत्र बदल्या केल्या गेल्या. त्यानंतर महसूल खात्यातील लिपिकवर्गीय (बाबू) यंत्रणेचा क्रमांक लावला जाणार होता. त्यांचीही सेवाज्येष्ठता यादी आणि कार्यकाळ तपासला जाणार होता. त्यामुळे हादरलेल्या या लिपिकांनी प्रशासनावर दबाव निर्माण केला. ज्येष्ठता यादी लावल्यास तुमच्या अवती-भोवती असलेली मर्जीतील मंडळीही दूर जाईल, याची जाणीव प्रशासनाला करून दिली. कामाचा दीर्घ अनुभव आणि सांगेल ते काम क्षणात करणारी चार-पाच जणांची टीम दूर गेल्यास आपली प्रशासकीय कामे कशी होतील, याची चिंता प्रशासनाच्या डोक्यात भिनली आणि त्यांनी लिपिकांची ज्येष्ठता यादी लावण्याचा व त्यानुसार बदल्या करण्याचा नाद सोडला. इकडे मात्र मंडल अधिकारी अस्वस्थ झाले. वर्षानुवर्ष एकाच टेबलवर सोईचे व वर कमाईचे काम करणार्‍या लिपिकांची ज्येष्ठता यादी लावली नाही मग आमच्यावरच अन्याय का असा प्रश्न उपस्थित करीत या मंडल अधिकार्‍यांनी आयुक्तांचा दरवाजा ठोठावल्याचे सांगण्यात येते. लिपिकांच्या राजकीय दबावापुढे जिल्हा प्रशासन नमल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.                     (प्रतिनिधी)