शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक फेरीचा निकाल उत्साह वाढवित गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 23:05 IST

शिवसेनेच्या कार्यालयात बुधवारपासूनच चहलपहल असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी वाशिमवरून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यासोबतच मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली होती.

ठळक मुद्देशिवसेनेला यश : भावना गवळींसाठी वाशिममधूनही धावून आले कार्यकर्ते

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवसेनेच्या कार्यालयात बुधवारपासूनच चहलपहल असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी वाशिमवरून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यासोबतच मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मुक्काम होता, त्या ठिकाणी शामियाना टाकण्यात आला होता.गुरुवारी पहाटेपासून या ठिकाणी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. प्रारंभी मतमोजणी केंद्रांवर ही गर्दी पाहायला मिळाली. प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांची गर्दी कार्यालयासोबत मतमोजणी केंद्रावरही वाढण्यास सुरुवात झाली. दुपारनंतर भावना गवळींच्या निवासस्थानी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. गुरुवारीच भावना गवळी यांचा वाढदिवसही होता. यासोबत त्या जास्त मतांनी निवडून येईल, अशा मतमोजणी फेºया जाहीर होत होत्या. यामुळे कार्यकर्त्यांनी भावना गवळी यांना फुलांचे गुलदस्ते भेट म्हणून देण्यास सुरूवात केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आमच्याकडून वाढदिवसाची ही विजयी भेट असल्याची प्रतिक्रिया भावना गवळींपुढे व्यक्त केली. गवळी यांच्या विजयाचे गणित लक्षात येताच जिल्हाभरातून गवळी यांना सतत फोन येत होते. सायंकाळी विजयी मिरवणूक काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली. गवळी यांच्या निवासस्थानापासून ते मतमोजणी कार्यालयापर्यंत ही मिरवणूक पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून त्यांनी भावना गवळींच्या विजयाच्या जयघोषासोबत ‘जय भवानी जय शिवाजी’ असे नारेही दिले. यावेळी गवळी यांनी कार्यकर्त्यांकडून विजयाच्या शुभेच्छा स्वीकारल्या.गवळी यांच्या वाढदिवसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिठाई आणण्यात आली होती. येणाºया प्रत्येक कार्यकर्त्याला आणि शुभचिंतकांना ही मिठाई दिली जात होती.शहरातील विविध भागातून आलेल्या महिलांनी पुष्पगुच्छ देऊन भावना गवळी यांचे अभिष्टचिंतन केले. आमच्या मनातला उमेदवार पुन्हा निवडून आला, असे मत महिलांनी यावेळी व्यक्त केले.प्रत्येक फेरीच्या मतांबाबत थेट ‘मातोश्री’वरून विचारणामतमोजणी केंद्रावर प्रत्येक फेरीला भावना गवळी यांचे मताधिक्य वाढत होते. प्रत्येक फेरीचे मत थेट पक्षाच्या मुंबई कार्यालयातून उमेदवाराला विचारले जात होते. हे मताधिक्य ४८ हजारांवर पोहोचताच भावना गवळी यांच्या निवासस्थानापुढे कार्यकर्त्यांची गर्दी वाढण्यास सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत या ठिकाणी मोठी गर्दी जमली. आणि कार्यकर्त्यांनी आपला जल्लोष साजरा करण्यास सुरूवात केली. या जल्लोषाचे रूपांतर विजयी रॅलीमध्ये झाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल