शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

लग्न समारंभातील उरलेले अन्न रूग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 15:36 IST

लग्न समारंभात बरेच अन्न उरते. उरलेल्या अन्नाचे दोन घास गरजवंतांपर्यंत पोहचले, तर अन्नाची नासाडी होणार नाही. भुकेल्यांना दोन घास मिळतील. याच उदात्त हेतूने प्रतिसाद फाउंडेशनने शासकीय रूग्णालयात ‘भूकेल्यांना दोन घास’ ही मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्दे‘भूकेल्यांना दोन घास’प्रतिसाद फाउंडेशनच्या तरुणांचे अविरत सामाजिक योगदान

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लग्न समारंभात बरेच अन्न उरते. उरलेल्या अन्नाचे दोन घास गरजवंतांपर्यंत पोहचले, तर अन्नाची नासाडी होणार नाही. भुकेल्यांना दोन घास मिळतील. याच उदात्त हेतूने प्रतिसाद फाउंडेशनने शासकीय रूग्णालयात ‘भूकेल्यांना दोन घास’ ही मोहीम सुरू केली आहे. लग्नात उरलेले अन्न रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहचविले जात आहे.यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात रूग्णांना भोजन मिळते. मात्र त्यांच्या नातेवाईकांना भोजनासाठी बाहेरच व्यवस्था करावी लागते. यातील बहुतांश रूग्णांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. यामुळे रूग्णाचे नातेवाईक अर्धपोटीच राहतात. या नातेवाईकांना भरपेट भोजन मिळावे म्हणून प्रतिसाद फाउंडेशनने एक अफलातून प्रयोग हाती घेतला आहे.शहरातील मंगलकार्यालयात दररोज कुठला ना कुठला कार्यक्रम अथवा लग्न प्रसंग असतो. कार्यक्रमाअंती बरेच अन्न शिल्लक राहते. या अन्नाची नासाडी होते. अशा ठिकाणी उरलेले अन्न एकत्र करून ते गरजवंतांपर्यंत पोहचविण्याचे काम प्रतिसाद फाउंडेशन करीत आहे. रूग्णालयात नातेवाईकांना हे भोजन पुरविण्याचे काम संपूर्ण टिम करीत आहे. या टिमने आतातर वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तींनीही भोजनदान करण्याचे आवाहन केले. दररोज याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अन्नाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लागत आहे.फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाणे, अ‍ॅड. हर्षल राठोड, सचिन कावरे, अर्पित शेरेकर, विनोद दोंदल, आकाश बाकडे, शंतनू पाठक यांच्यासह असंख्य सदस्य या उपक्रमासाठी झटत आहे. यामुळे शासकीय रूग्णालयात रूग्णासोबत येणाºया नातेवाईकांची चिंता दूर होत आहे.दररोज २०० लोकांची व्यवस्थागरजवंत, गरीब, भिक्षेकरी आणि शासकीय रूग्णालयातील रूग्णांना अन्न वाटप करण्याचे काम ही मंडळी दोन ते तीन महिन्यांपासून करत आहे. या कामात हॉटेल व्यावसायिकांचीही मोठी मदत होत आहे. दरोज किमान २०० नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था ही मंडळी करीत आहे.अन्नदानासोबत रक्तदानहीरूग्णालयात केवळ अन्नदान करून ही मंडळी मोकळी होत नाही. रूग्णालयात दररोज कोणाला तरी रक्ताची गरज भासते. अशा स्थितीत पर्यायी रक्त दिले तरच मोफत रक्त मिळते. अन्यथा रक्तासाठी पैसे मोजावे लागतात. प्रतिसादच्या टिमने गरजवंतांना रक्त देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार ही मंडळी आता काम करीत आहे.

टॅग्स :foodअन्न