शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शक निवडणुकांची जबाबदारी सर्वांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा नियोजन सभागृहात पोलीस विभागाचा आढावा ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : जिल्हाभरातील ठाणेदारांकडून स्थितीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा नियोजन सभागृहात पोलीस विभागाचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे आदी उपस्थित होते.नि:पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभागाला नागरिकांनी सहकार्य करावे. अप्रिय घटना त्वरीत लक्षात आणून द्याव्यात आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नोडल आॅफीसर व विभाग प्रमुख यांच्याकडे सोपविलेल्या कामकाजाबाबत चर्चा केली. आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन होईल, कोठेही त्याचा भंग होणार नाही, याबाबत निर्देश दिले.यावेळी कायदा व सुव्यवस्था, शस्त्र जप्ती, प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपार व इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यात आला. बैठकीला वाशिम व कारंजा येथील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गोगटे आणि अनुप खांडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.सतत पेट्रोलिंगचे पोलिसांना निर्देशजिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व सतत पेट्रोलिंग चालू ठेवण्याचे निर्देश दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी निवडणुकीच्या काळात दारुबंदी पथक योग्य दिशेने काम करेल व त्याकडे आपल्या विभागाचे विशेष लक्ष राहील, असे सांगितले. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर अधिकाऱ्यांनी जास्त लक्ष केंद्रित करून काही गैरप्रकार आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशा सूचना दिल्या.