शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’च्या अध्यक्षांचा राजीनामा

By admin | Updated: May 20, 2017 02:36 IST

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून वसंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वर्षभरापूर्वी अविरोध

वाद चव्हाट्यावर : साखर कारखाना मोजतोय अखेरच्या घटका लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून वसंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वर्षभरापूर्वी अविरोध निवडलेल्या माधवराव पाटील जवळगावकर यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. संचालक मंडळात अंतर्गत धुसफूस काही दिवसांपासून सुरू होती. त्याचे रूपांतर अध्यक्षांच्या राजीनाम्यात झाले. आधीच कारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक असून या राजीनामाप्रकरणाने कारखान्यावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे वसंत सहकारी साखर कारखाना आहे. गत काही वर्षात या कारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. गतवर्षी कारखान्याच्या आर्थिक स्थितीला पुढे करत सर्वपक्षीय नेते एकत्र आले. पुसद अर्बन बँकेच्या सभागृहात माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी आजी-माजी आमदारांची सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत कारखान्याच्या हितासाठी संचालक मंडळ अविरोध निवडण्याचा निर्णय झाला. सर्वानुमते हदगावचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची अध्यक्षपदी तर माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकरांचे बंधू कृष्णा पाटील देवसरकरांची उपाध्यक्षपदी निवड केली. त्यावेळी माजी आमदार अ‍ॅड.अनंतराव देवसरकर गट, प्रकाश पाटील देवसरकर गट आणि आमदार मनोहरराव नाईक गटाचे प्रत्येकी तीन संचालक तर माधवराव पाटील एक, बापुराव पाटील एक, विजयराव खडसे एक अशा १५ जणांचे संचालक मंडळ निवडल्या गेले. तर चार जागा अध्यक्ष माधवराव जवळगावकर यांनी घ्यायचे, असे ठरले. वसंत कारखाना वाचला पाहिजे, या हेतूने सर्वांनी अविरोध निवड केली. परंतु गत काही दिवसांपासून अंतर्गत हेवेदावे पुढे येवू लागले. कारखान्याचे अध्यक्ष माधवराव पाटील अनेक बैठकांना उपस्थित राहात नव्हते. त्यांच्या विरोधात संचालकमंडळ गेले. त्यातच कामगारांचे पगार नाही, ऊस उत्पादकांचे बिल थकीत आहे. ५०० कामगारांना अर्धपगारी रजेवर पाठविले आहे, तर दोन वर्षांपासून थकीत वीज बिलाने कामगार वसाहतीचा पुरवठा खंडित केला आहे. एवढेच नाही तर पाच लाखांचे पितळ चोरीप्रकरण उघडकीस आले होते. दुसरीकडे अध्यक्षांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू होती. त्यासाठी पुसदमध्ये तीन बैठका झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, सर्वच संचालकांनी अध्यक्ष बदलण्यासाठी हिरवी झेंडी दिली असल्याची चर्चा होती. या सर्व प्रकारामुळे १८ मे रोजी अध्यक्ष माधवराव पाटील जवळगावकर यांनी आपला राजीनामा दिला. सदर राजीनामा कार्यकारी संचालक राजेंद्र खडप यांच्या सुपूर्द करण्यात आला. अध्यक्षांनी दिलेल्या या राजीनाम्याने एकच खळबळ उडाली आहे.