शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जलाशये अद्याप तहानलेलीच

By admin | Updated: August 26, 2014 23:45 IST

हवामान खात्याने यावर्षी सर्वात कमी पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. आज जिल्हयाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

यवतमाळ : हवामान खात्याने यावर्षी सर्वात कमी पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. आज जिल्हयाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही स्थिती दमदार पाऊस न आल्यास यापुढे आणखी भयावह होण्याची स्थिती आहे. पावसाचे तीन मुख्य महिने संपत आले. मात्र नदी पात्रात पूर आलाच नाही. परिणामी जलाशयात तोकडा पाणीसाठा शिल्लक राहला आहे. यामध्ये फारशी वाढ झाली नाही. परिणामी जिल्ह्याला भीषण टंचाईचा सामना करावा लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. अल निनोच्या प्रभावाने यावर्षी सर्वात कमी पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. या इशाऱ्याला गांभीर्याने घेतले गेले नाही. आता पावसाचे तीन मुख्य महिने संपल्यानंतरही पाऊस बरसला नाही. यामुळे प्रशासन पाणीटंचाई निवारण्याच्या कामाला लागले आहे. युध्दपातळीवर पाणी टंचाई निवारण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी पाणी बचतीची तसदी घेतली असती तर पाणी टंचाई निवारण्यास खऱ्या अर्थाने सहकार्य लाभले असते.जिल्ह्यातील सर्व मुख्य प्रकल्पात १२ ते ४० टक्के पाणी शिल्लक आहे. गतवर्षी यावेळी सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो अवस्थेत होते. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा प्रकल्प गतवर्षी आॅगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाला होता. काही दिवसांपूर्वी या प्रकल्पात ३८ टक्के जलसाठा होता. गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे हा जलसाठा ४८ टक्केच्या घरात पोहचला आहे. चापडोह प्रकल्पाची स्थिती जैसे थे अशीच आहे. या प्रकल्पात ४५.७७ टक्के पाणी शिल्लक राहले आहे. पुस प्रकल्पात २०.८१ टक्के जलसाठा आहे. तर अरूणावती प्रकल्पात कुठलीही वाढ नोंदविली गेली नाही. हा प्रकल्प १५.३८ टक्क्यावर स्थिर आहे. बेंबळा प्रकल्पाच्या जलसाठ्यात ५ टक्के वाढ झाली आहे. या ठिकाणी ३९.९२ टक्के पाणी शिल्लक आहे. सायखेड प्रकल्पाचा जलसाठा ४३ टक्क्यांवर पोहचला आहे. गोकी प्रकल्प क्षेत्रात १० टक्के वाढ झाली आहे. यामध्ये ४५ टक्के जलसाठा कायम आहे. वाघाडी प्रकल्पात ३४ टक्के पाणी आहे. तर सर्वाधिक ७५ टक्के जलसाठा बोरगाव प्रकल्पात आहे. लोअर पुस प्रकल्पाच्या पात्रात ४९ टक्के जलसाठा आहे. अडाण प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणी शिल्लक आहे. नवरगाव प्रकल्पात ३९.५० टक्के पाणी शिल्लक आहे. (शहर वार्ताहर)