शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

१२०० हेक्टरवरील आरक्षित जमीन शेरा शिथिल

By admin | Updated: January 18, 2015 22:48 IST

पाटबंधारे प्रकल्पांतर्गत आरक्षित करण्यात आलेल्या राखीव शेतजमिनीचे निर्बंध राज्य शासनाने उठविले आहे. त्यामुळे १२०० हेक्टरमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यवतमाळ : पाटबंधारे प्रकल्पांतर्गत आरक्षित करण्यात आलेल्या राखीव शेतजमिनीचे निर्बंध राज्य शासनाने उठविले आहे. त्यामुळे १२०० हेक्टरमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रकल्प क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार असून खाते फोड करण्यासोबत विविध प्रश्नावर मात करता येणार आहे.पाटबंधारे प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील १२०० हेक्टर जमीन आरक्षित करण्यात आली होती. १९७६ पासून या शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार करताना बंधने येत होती. भविष्यात प्रकल्प क्षेत्रात वाढ झाल्यास या आरक्षित शेतजमिनीचा आधार घेतला जाणार होता. अशा ठिकाणी पुनर्वसनाच्या दृष्टीने शेतजमिनी आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रकल्प क्षेत्रातील जमिनीवर खरेदी-विक्री व्यवहार पूर्णत: बंद होती. शेत जमिनीवर खाते फोड करण्यास मज्जावही करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर सिंचनासाठी अर्जही दाखल करता येत नव्हते. त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या एका आदेशाने निर्बंध उठविण्यात आले आहे. या आदेशानुसार प्रकल्पांतर्गत बाधित व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी भविष्यात भूसंपादनाची आवश्यकता भासल्यास प्रकल्प यंत्रणेने योग्य मोबदला देण्याच्या सूचना दिल्या आहे. जिल्ह्यातील १२ हजार हेक्टर शेतजमीन प्रकल्पांतर्गत आरक्षित करण्यात आली होती. आता आरक्षित जमिनीचा शेरा शासन आदेशाने शिथिल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र यामध्ये काही अटी सूचविण्यात आल्या आहे. आतापर्यंत संपादनाची कार्यवाही पूर्ण करून शासनाने संपादित केलेल्या व शासनाच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे प्रकल्पग्रस्तांना प्रचलित पद्धतीनेनुसार वाटप करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सुरू ठेवावी, असेही या शासन आदेशात म्हटले आहे. एकंदरित या आदेशाने प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (शहर वार्ताहर)