शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
3
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
4
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
8
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
9
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
10
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
11
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
12
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
13
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
14
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
15
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
16
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
17
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
18
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
19
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
20
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला

नगराध्यक्षपदाचे आरक्षण लांबणीवर

By admin | Updated: June 9, 2016 02:03 IST

जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी मुंबईत काढले जाणारे आरक्षण अनिश्चित काळासाठी

 यवतमाळ : जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी मुंबईत काढले जाणारे आरक्षण अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेक राजकीय कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.जिल्ह्यातील वणी, घाटंजी, आर्णी, यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड या आठ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील काही महिन्यात होऊ घातल्या आहे. यावेळी नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे घोडेबाजाराला आपसुकच ब्रेक लागणार आहे. नगराध्यक्षपद जनतेतून असल्याने अनेकांची त्यासाठी इच्छा जागृत झाली आहे. विशेषत: विधानसभेची निवडणूक लढविलेले व पराभूत झालेल्या उमेदवारांचा नगराध्यक्ष निवडणुकीसाठी अधिक जोर असल्याचे दिसून येते. नगराध्यक्ष पदासाठी बुधवारी मुंबईत नगरविकास विभागात आरक्षणाची सोडत काढली जाणार होती. त्यामुळे सकाळपासूनच इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मुंबईकडे नजरा लागल्या होत्या. मात्र तांत्रिक कारण देत ऐनवेळी नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत लांबणीवर टाकण्यात आली. ती नेमकी केव्हा होणार हे स्पष्ट नसल्याने अनिश्चित काळासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगितले जाते. सोडत न निघाल्याने नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला असला तरी त्यांची फिल्डींग मात्र कायम आहे. आज आरक्षण निश्चित झाले असते तर कुणी नगराध्यक्षाची निवडणूक लढवायची आणि कुणी नगरसेवकाची हेसुद्धा या इच्छुकांमधून स्पष्ट झाले असते. नगराध्यक्षपद डोळ्यापुढे ठेऊन इच्छुकांनी नगरपरिषद क्षेत्रात आपली तोंड ओळख निर्माण करणे सुरु केले आहे. कुणी अभिनंदन-शुभेच्छांच्या फ्लेक्सद्वारे तर कुणी टंचाई काळात पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवून आणि त्यावर आपले बॅनर लावून ही ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी अचानक वार्डावार्डाचा फेरफटका मारून भल्या पहाटे समस्या जाणून घेण्याचा प्रयत्नही चालविला आहे. यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात सत्ताधारी भाजपा-शिवसेनेसोबतच काँग्रेस-राष्ट्रवादी व अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविण्यासाठी काहींनी ‘डिलिंग’चीही तयारी ठेवली आहे. सोईचे आरक्षण न निघाल्यास इच्छुकांना नगरसेवक पदावर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी म्हणेल तो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असा सूर भाजपात ऐकायला मिळतो आहे. त्या दृष्टीने संबंधित लोकप्रतिनिधींशी जवळीक साधण्याचा व आम्ही केवळ तुमचेच निष्ठावान हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु यावेळी भाजपा स्वत: या निवडणुकांमध्ये लक्ष घालणार असल्याची माहिती आहे. लोकप्रतिनिधींना पक्ष स्तरावर खरोखरच किती किंमत दिली जाते, हे भाजपा जिल्हाध्यक्ष पदाच्या अलिकडेच झालेल्या निवडीने दाखवून दिले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी निश्चितीतही जिल्हाध्यक्ष पदाची पुनरावृत्ती होणार नाही ना अशी हूरहूर असलेले कार्यकर्ते पक्ष व लोकप्रतिनिधींपासून समांतर अंतर ठेवण्याची खबरदारी घेत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी) पांढरकवडा, नेरबाबत संभ्रम४जिल्ह्यातील दहा पैकी पांढरकवडा व नेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आणखी बराच अवधी आहे. मात्र अन्य नगरपरिषदांच्या आरक्षणासोबतच या दोन नगरपरिषदांचेही आरक्षण निघेल काय याबाबत संभ्रम असल्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.