लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेला अटक करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेला अटक करावी, शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यात यावे, आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज माफ करावे, जीवनावश्यक वस्तूंसह पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यात याव्या, भूमिहीनांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे, मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले.यावेळी राज्य उपाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, जिल्हाध्यक्ष डी.जे.खंडरे, जिल्हा कार्याध्यक्ष के.एस. नाईक, जिल्हा महासचिव रवी श्रीरामे, जिल्हा उपाध्यक्ष एन.जे. स्थुल, जिल्हा उपाध्यक्ष राजरतन गणवीर, सचिव पी.एम. करमणकर, सचिव जे.डी. मनोहर, बाबाराव दुपारे यांच्यासह अनेकजन उपस्थित होते.
संभाजी भिडेला अटकेसाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:05 IST
कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेला अटक करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
संभाजी भिडेला अटकेसाठी निवेदन
ठळक मुद्देपीपल्स रिपब्लिकन पार्टी : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी