शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ं‘मेडिकल’च्या सात विभागप्रमुखांची बदली

By admin | Updated: July 5, 2015 02:25 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक,

पाच सहयोगी प्राध्यापक : पाच डॉॅक्टर रूजू झालेच नाहीयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीने रिक्त झालेल्या पाच जागेवर अद्यापही नव्याने बदलून आलेले डॉक्टर रुजू झाले नाही. महाविद्यालयातील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. एस.एस. मोरे हे नांदेड येथे बदलून गेले. त्यांच्या जागेवर नांदेड येथील डॉॅ.मिलिंद कांबळे रुजू झाले आहेत. औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम.सी. मेहता यांच्या जागेवर नागपूर येथील डॉ. सुजाता दुधगावकर बदलून आल्या आहेत. पीएसएम विभागाला बरेच दिवसानंतर विभाग प्रमुख लाभले आहे. येथे डॉ. पी.ए. हिवरकर रुजू झाले आहेत. क्ष-किरण विभागातील डॉ. एस.एन. सातघरे यांच्या जागेवर अकोला येथील डॉ. अरुणा पवार आल्या आहेत. मायक्रोबायोलॉजी विभागात डॉ. व्ही.जे. काटकर यांच्या जागेवर डॉ. एन.जी. देवगडे आले आहेत. मात्र अजूनही डॉ. एस. आर थोरात यांच्या बदलीमुळे रिक्त झालेले अस्थिव्यंगोपचार विभागातील जागा रिक्त आहे. तेथे डॉ. मारोती लिंगावार यांची बदली झाली आहे. परंतु ते अद्याप रुजू झाले नाहीत. त्वचारोग विभागातील डॉ. आर.बी चव्हाण यांच्या रिक्त जागेवर कोणालाच देण्यात आले नाही. याप्रमाणेच सहयोगी प्राध्यापक डॉ. एन.डी. बालाणी, ए.व्ही. गावंडे, मो. इब्राहीम, डॉ. रत्ना डांगे, डॉ. किशोर इंगोले याची बदली झाली आहे. यापैकी केवळ पीएसएम विभागात डॉ. एस.एम भिलकर आणि मायक्रोबायोलॉजी विभागात डॉ. विवेक गुजर रुजू झाले आहेत. सहायोगी प्राध्यापकांच्या अजूनही तीन जागा रिक्त आहे. शिवाय सहायक प्राध्यापक डॉ. शरद कुचेवार यांच्या बदलीने न्याय वैद्यकशास्त्र विभागातील रिक्त झालेल्या जागेवर कुणालाच देण्यात आले नाही. त्यामुळे महाविद्यालयातील २१ विभागापैकी जवळपास सात विभागात मोठी पदे रिक्त आहेत. यावर तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)