शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

By admin | Updated: June 7, 2016 07:40 IST

शहरी विद्यार्थ्यांसोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांच्या विद्यार्थ्यांनीही उज्ज्वल यश संपादन केले आहे.

यवतमाळ : शहरी विद्यार्थ्यांसोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांच्या विद्यार्थ्यांनीही उज्ज्वल यश संपादन केले आहे. काही शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. गावापासून दूर अंतरावर असलेल्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी आहे. घाटंजी, दारव्हा तालुक्यातील प्रत्येकी तीन शाळा, राळेगावात दोन, तर आर्णी तालुक्यातील दोन शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)घाटंजी ८४.०६घाटंजी : तालुक्यातून २ हजार ५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ हजार ७२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८४.०६ एवढी आहे. पुनर्परीक्षार्थी ९१ पैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ६५.९३ आहे. दोन्ही मिळून उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ८३.२९ एवढी आहे. शासकीय आश्रमशाळा रामपूरचे २० पैकी २०, जगदंबा विद्यालय सायतखर्डाचे सात पैकी सात, तर एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले.नेर ८१.५१नेर : तालुक्यातून एक हजार ७०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील एक हजार ४३७ उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८१.५१ एवढी आहे. पुनर्परीक्षार्थी ११३ पैकी ४५ विद्यार्थी यशस्वी झाले. त्यांचा निकाल ३९.८२ टक्के लागला. दोन्ही मिळून निकालाची टक्केवारी ७९ एवढी आहे. या तालुक्यातून सर्वाधिक ९७.६१ टक्के निकाल अडगाव खाकी येथील जय खाकीनाथ विद्यालयाचा लागला आहे. दारव्हा ८१.७९दारव्हा : तालुक्यातील तीन शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. यामध्ये मुंगसाजी विद्यालय धामणगाव(देव), हजरत ख्वाजा म. खिस्ती उर्दू हायस्कूल तळेगाव(देशमुख), मिल्लत इंग्लिश स्कूल दारव्हा या शाळांचा समावेश आहे. परीक्षेस बसलेले दोन हजार ६६४ पैकी दोन हजार १७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८१.७९ एवढी आहे. आर्णी ८३.२५आर्णी : तालुक्यातून परीक्षा दिलेले दोन हजार १०८ पैकी एक हजार ७५५ विद्यार्थी यशस्वी झाले. या निकालाची टक्केवारी ८३.२५ एवढी आहे. आर्णी येथील सनराईज नर्सरी व कॉन्व्हेंटचे २९ पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तसेच दातोडी येथील मातोश्री सुर्ताबाई चव्हाण महाविद्यालयाचे सर्व ४६ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. पुनर्परीक्षार्थी १२१ पैकी ६० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचा निकाल ४९.५९ टक्के लागला आहे. तालुक्याच्या दोनही मिळून निकालाची टक्केवारी ४१.४३ एवढी आहे.बाभूळगाव ७६.४७बाभूळगाव : तालुक्यातील २१ शाळांमधून एक हजार २५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ९६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी ७६.४७ एवढी आहे. सर्वाधिक ९५.२३ टक्के निकाल आसेगाव येथील वसंत नाईक हायस्कूलचा लागला आहे. या शाळेतील ६३ पैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या खालोखाल चिमणा बागापूर येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९२.१८ टक्के लागला. या शाळेतून परीक्षा दिलेले ६४ पैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थी चार पैकी चारही विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.कळंब ८०.०१कळंब : तालुक्याचा दहावीचा निकाल ८०.०१ टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेल्या एक हजार ७०१ विद्यार्थ्यांपैकी एक हजार ३६१ विद्यार्थी यशस्वी झाले. सर्वाधिक ९६.२९ टक्के निकाल नांझा येथील प्र.मा. रुईकर ट्रस्ट विद्यालयाचा लागला. परीक्षेस बसलेले ५४ पैकी ५२ विद्यार्थी यशस्वी झाले. राळेगाव ७९.७६राळेगाव : तालुक्यातून परीक्षा दिलेले एक हजार ४४३ पैकी एक हजार १५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ७९.७६ एवढी आहे. या तालुक्यातील दोन शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. यामध्ये श्री महावीर इंग्लिश मीडियम स्कूल राळेगाव आणि स्मॉल वंडर कॉन्व्हेंट वडकीचा समावेश आहे. पुसद ८६.३५पुसद : तालुक्याच्या ७१ शाळांमधून पाच हजार ४९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील चार हजार ७४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी ८६.३५ एवढी आहे. उमरखेड ७४.४२उमरखेड : तालुक्यातील ५२ शाळांमधून तीन हजार ५१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील दोन हजार ६१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७४.४२ टक्के निकाल या तालुक्याने दिला आहे. विद्यार्थ्यांची उत्तीर्ण संख्या एक हजार ३७३, तर एक हजार २४६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.दिग्रस ८८.६८दिग्रस : तालुक्यातील ३५ शाळांमधून दोन हजार ५१८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील दोन हजार २३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८८.६८ एवढी आहे. महागाव ८६.४५महागाव : तालुक्यातील ३० शाळांमधून दोन हजार ५१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील दोन हजार १७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याने ८६.४५ टक्के निकाल दिला आहे.