शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:17 IST

रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे म्हणाले. आर्णी येथील पक्ष कार्यकर्ता मेळावाप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : आर्णी येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे म्हणाले. आर्णी येथील पक्ष कार्यकर्ता मेळावाप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करीत होते.नितीन गडकरी यांच्याकडे आता सिंचन विभाग आल्यामुळे महाराष्ट्रात सिंचनाचे प्रमाण निश्चितच वाढणार आहे. गडकरींनी ज्या पद्धतीने रोडचे जाळे विणले आहे. त्याच धर्तीवर रखडलेले सिंचनाचे मोठे प्रकल्प आता मार्गी लागणार आहेत. यामध्ये आपल्या जिल्ह्यातील चिमटा येथील पैनगंगा प्रकल्पसुद्धा आता होणार आहे. यामुळे राज्यातील शेतकरी वर्गाचे उत्पन्न निश्चितच वाढणार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. यावेळी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टरमंडळीने सुद्धा भाजपात प्रवेश घेतला. यामध्ये काँग्रेस, मनसे, शिवसेना या पक्षातील अनेक लोकांनी भाजपात प्रवेश घेतला.या कार्यक्रमाला यावेळी आमदार राजू तोडसाम, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निलय नाईक, उद्धवराव येरमे, जिल्हा परीषद सदस्य प्रकाश राठोड, पंचायत समिती उपसभापती पपीता भाकरे, प्रियतमा बन्सोड, नुनेश्वर आडे विपीन राठोड, प्रा. विनीत माहुरे, बाळासाहेब चावरे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.