शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा! जनआरोग्य योजनेत कॅन्सर चाचणीचा समावेश

By अविनाश साबापुरे | Updated: November 18, 2023 14:22 IST

फाॅलोअप चाचण्या करणेही शक्य होणार : यवतमाळच्या कॅन्सरमुक्त भारत अभियानाची दखल

यवतमाळ : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता कॅन्सर चाचणीचाही समावेश झाला आहे. तर रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतरच्या फाॅलोअप चाचण्याही या योजनेतून करणे शक्य होणार आहे. यवतमाळ येथील ज्योती कॅन्सर रिलिफ सेंटरने गेल्या काही वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने हा निर्णय घेतला आहे, हे विशेष. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीलाही पाठविण्यात आला आहे.

आतापर्यंत महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णाला दाखल केल्यानंतर त्याच्या पॅकेजमधील उपचाराचा खर्च रुग्ण डिस्चार्जपर्यंतच केला जायचा. मात्र, त्यानंतर आजाराच्या फॉलोअपसाठी काही महागड्या चाचण्या कराव्या लागल्या तर त्या रुग्णाला स्वखर्चातून कराव्या लागत असे. परंतु कॅन्सरच्या बाबतीत आता पॅकेजमधून खर्च करून रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर फॉलोअपमध्ये काही चाचण्या कराव्या लागल्या तर त्याचा खर्च या योजनेमधून केला जाणार आहे.

कॅन्सरवरील उपचारानंतर फॉलोअपसाठी जेव्हा रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यावेळी त्यांना लिक्विड बायोप्सी, तसेच कॅन्सरशी संबंधित खर्चिक चाचण्या कराव्या लागायच्या. काही चाचण्या १५ ते २० हजारांच्या घरात खर्च येत असे. गेल्या काही वर्षांपासून तो फॉलोअप चाचण्यांचा करण्यात यावा, याबाबत डॉक्टरांमध्ये चर्चा होती. अखेर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेच्या अध्यक्षतेखाली काही कर्करोग तज्ज्ञ डॉक्टरांनी कोणत्या फॉलोअप चाचण्या पॅकेजमधून करण्यात याव्यात, हे सुचविले. त्यानुसार, त्या चाचण्या लवकरच या पॅकेजमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कॅन्सरचाच समावेश का?योजनेत राज्यातील १,००० रुग्णालयांचा समावेश असून आजाराची संख्या ९९६ वरून १,३५६ इतकी केली आहे. या योजनेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सर हा दुर्धर आजार असून या आजारचे उपचार घेऊन रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला नियमित फॉलोअपची गरज असते. त्या काळात त्याला आजार आटोक्यात आला आहे की नाही, हे पाहण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. त्यामध्ये सीटी स्कॅन, पेट स्कॅन, बायोप्सी, एमआरआय यासह आणखी कॅन्सर आजाराशी निगडित चाचण्या कराव्या लागतात. त्यासाठी लागणारा खर्च अधिक असतो. त्यामुळे या चाचण्या योजनेच्या पॅकेजमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महागड्या कॅन्सर चाचण्या मोफत करून गरीब रुग्णांना दिलासा देण्यात यावा या संदर्भात मागील हिवाळी अधिवेशनात धरणे दिले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. यवतमाळातून कॅन्सरमुक्त भारत अभियान सुरू केले. त्याची दखल शासनाने घेतली आहे. या निर्णयामुळे राज्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.- सतीश मुस्कंदे, संचालक, ज्योती कॅन्सर रिलिफ सेंटर, यवतमाळ

टॅग्स :cancerकर्करोग