शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पुनवटचे ग्रामसेवक निलंबित

By admin | Updated: June 19, 2016 02:23 IST

येथील पंचायत समितीअंतर्गत पुनवट व नायगाव (बु.) ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणारे ग्रामसेवक ए.एस. पाटेकर यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १३ जून रोजी निलंबित केले.

वणी : येथील पंचायत समितीअंतर्गत पुनवट व नायगाव (बु.) ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणारे ग्रामसेवक ए.एस. पाटेकर यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १३ जून रोजी निलंबित केले.एस.एस. पाटेकर यांच्याकडे पुनवट व नायगाव (बु.) या दोन मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार होता. मात्र पाटेकर हे या दोनपैकी कोणत्याही गावात वास्तव्यात राहत नव्हते. तालुका स्तरावरून कारभार पाहत असताना दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये अनेकवेळा कर्तव्यात कसूर होत होता. त्यामुळे दोन्ही गावातील नागरिक नाराज होते. पुनवट येथे सामान्य निधीच्या बांधकामामध्ये खोटे मस्टर भरून अपहार करण्यात आला. याची तक्रार पंचायत समिती सदस्य शरद ठाकरे यांनी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच नायगाव (बु.) येथील रस्त्याच्या खडीकरण कामात अपहार झाल्याची तक्रार रामकृष्ण बोबडे व इतर गावकऱ्यांनी केली होती. या कामावरही चौकशी समिती नेमण्यात आली होती. १३ व्या वित्त आयोगातून झालेल्या रस्त्याच्या बांधकामात मोठा गैरप्रकार झाल्याचे चौकशी समितीला आढळले. तसा अहवाल चौकशी समितीने गटविकास अधिकाऱ्यांना दिला. दोन्ही ठिकाणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालात पाटेकर हे दोषी आढळल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाटेकर यांना तत्काळ निलंबित केले. त्यांना राळेगाव पंचायत समिती मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले. मुख्यालयी वास्तव्यास न राहणे, कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाची अवहेलना करणे, १५ टक्के मागासवर्ग, तीन टक्के अपंग व १० टक्के महिला व बालकन्या निधीवर खर्च न करणे आणि नायगाव (बु.) येथील १३वा वित्त आयोगातील कामामध्ये गंभीर स्वरूपाच्या अनियमितता असणे, हे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहे. या सर्व आरोपाची चौकशी होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)