यवतमाळ : कंत्राटी तत्त्वावर कृष्ठरोग तज्ज्ञांना नियुक्ती देण्यात आली. पदावर असतानाच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. या संदर्भात कुष्ठरोग संचालकांनी या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करून घेण्याचे आदेश दिले. मात्र सहाय्यक संचालकांनी रूजू करून घेण्यास नकार दिला आहे. या कर्मचाऱ्यांनी आरोग्य संचालक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.कंत्राटी कृष्ठरोग तज्ज्ञांना परत कामावर घेण्याचा आदेश संचालकांनी दिला आहे. यानुसार नाशिक, उस्मानाबाद या जिल्ह्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना रुजू करून घेतले जात आहे. यवतमाळ येथेही कृष्ठरोग तज्ज्ञाला नियुक्त करून घेण्यात यावे, अशी मागणी कृष्ठरोग तज्ज्ञांनी सहाय्यक संचालक डॉ.डी.डी. भगत यांच्याकडे केली. मात्र त्यांनी या बाबीला स्पष्ट नकार दिला आहे. ही बाब आरोग्य संचालकांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे. यावेळी प्रवीण मेंढे, राजेश चौधरी, अनिल विधाते, शहेजाद विरानी, रवी गडलिंग, प्रतिभा खाडे आदी उपस्थित होते.
कृष्ठरोग तज्ज्ञांना रुजू करून घेण्यास नकार
By admin | Updated: June 22, 2016 02:26 IST