शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चेतना अभियानाला मदतीस नकार

By admin | Updated: March 12, 2016 02:54 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून यवतमाळ जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे.

सीईओकडे तक्रार : मनोरंजनावर उधळपट्टी, २००९ च्या वर्गणीचा हिशेबच नाहीयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून यवतमाळ जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी दहा कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. चेतना अभियानाच्या नावावर मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जात आहेत. अशा स्थितीत जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक संघटनांनी चेतना अभियानाला आर्थिक मदत देण्यास विरोध केला आहे. अभियानासाठी कोणालाही सक्ती केली जाऊ नये, अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. बळीराजा चेतना अभियान समितीकडून जनजागृतीचे कार्यक्रम, त्रस्त कुटुंबांना शोधून आर्थिक मदत, मुलामुलींचे शिक्षण, आरोग्यावरील खर्चास मदत यासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून निधी संकलित करून अभियानाच्या ट्रस्टच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या संदर्भात विभागप्रमुखांना कोणतेही आदेश नाहीत. हा मदतनिधी स्वेच्छेने असल्यास निधी कपात करताना कर्मचाऱ्यांची संमती आवश्यक असते, मात्र येथे अशी कुठलीही प्रक्रिया होताना दिसत नाही. एकंदर संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वीसुद्धा २००९ मध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून शेतकरी व शेतमजूर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्याच्या नावाखाली १०० ते पाचशे रुपये असा निधी जमा करण्यात आला होता. या निधीचा धनाकर्ष कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण समिती, यवतमाळ यांना देण्याचे निर्देश तत्कालिन सीईओंनी दिले होते. त्यानंतर मात्र निधीचा विनियोग कशाप्रकारे झाला, त्याचा हिशेब देणगीदारांना अद्याप देण्यात आलेला नाही, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने वारंवार चौकशीची मागणी केली होती. नियमबाह्य पद्धतीने संघटनांना विश्वासात न घेता निधी संकलनाला विरोध असल्याची तक्रार सीईओ मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, प्राथमिक शिक्षक संघाचे सुभाष धवसे, महाराष्ट्र शिक्षक भारतीचे गजानन पवार, उर्दू शिक्षक संघटनेचे हयातखान नूरखाँ, अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शहाजी घुले, केंद्रप्रमुख संघाचे अध्यक्ष चंद्रमणी वानखडे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किरण मानकर आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बळीराजा चेतना अभियानातील वास्तवच पुढे आले आहे. किमान यापुढे तरी झालेल्या चुका सुधारून शेतकऱ्यांसाठी काही रचनात्मक कार्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)