शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेतील पराभवाचे चिंतन

By admin | Updated: June 11, 2014 23:34 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव नेमका कशामुळे झाला, यावर विचार मंथन करण्यासाठी अखेर १५ जूनचा मुहूर्त निघाला. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.

महिना लोटला : अखेर १५ जूनचा मुहूर्तयवतमाळ : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव नेमका कशामुळे झाला, यावर विचार मंथन करण्यासाठी अखेर १५ जूनचा मुहूर्त निघाला. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजीराव मोघे तब्बल ९३ हजार तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात संजय देवतळे तीन लाख ७६ हजार मतांनी पराभूत झाले. अनुक्रमे शिवसेनेच्या भावना गवळी आणि भाजपाचे हंसराज अहीर यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवाने काँग्रेस जणू ‘कोमात’ गेली आहे. राज्यात अन्य भागांमध्ये या पराभवावर लगेच चिंतन झाले. नेमकी कुठे चुक झाली, पराभवामागील कारणे, कोण विरोधात फिरले यावर चर्चा झाली. अमरावतीत तर विधानसभा निवडणुका राष्ट्रवादीसोबत लढू नये असा ठरावच काँग्रेसने घेतला. सर्व जिल्ह्यात लोकसभेतील पराभवाचा विषय लगेच गांभीर्याने घेतला गेला असताना यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी मात्र त्याला अपवाद ठरली. सुमारे महिनाभरापासून जिल्हा काँग्रेसमध्ये मरणासन्न अवस्था आहे. आरोप-प्रत्यारोप होण्याच्या भीतीने, कार्यकर्त्यांकडून मंत्री, आमदार व नेत्यांचे वाभाडे काढले जाण्याच्या भीतीने काँग्रेसने ही बैठक लांबणीवर टाकल्याचे सांगितले जाते. पराभवाच्या मुद्यावर पक्षाचे कार्यकर्ते बाहेरच खुल्या चर्चा करताना दिसले. पक्ष स्तरावर मात्र कोणतीच बैठक न झाल्याने पराभवाची कारणे अधिकृतरीत्या पुढे आली नाही. लोकसभेतील पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांवर होती. मात्र त्यांनी त्यासाठी तातडीने बैठक घेतली नाही तर दुसरीकडे या अध्यक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात उमेदवार कोण असावा म्हणून पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मात्र बैठक घेतली. मीच उमेदवार रहावे असा शब्द वामनराव कासावारांया बैठकीत अप्रत्यक्ष वदवून घेतला. अन्य काही नेत्यांनीही अशी तुकड्या तुकड्या अनौपचारिक बैठका घेतल्या. जिल्हा काँग्रेस कमिटीची मुख्य बैठक निकालाच्या महिनाभरानंतर रविवार १५ जून रोजी दुपारी १ वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात होत आहे. या बैठकीला खासदार, मंत्री, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे प्रमुख आदींना बोलविण्यात आले आहे. या बैठकीत लोकसभेतील पराभव आणि आगामी विधानसभेतील रणनीतीबाबत चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जाते. काँग्रेसची ही बैठक गाजण्याची चिन्हे आहे. काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नेत्यांची भीती न बाळगता बैठक गाजविण्याची तयारीही केली आहे. नेत्यांच्या गटबाजीच्या भांडणात निष्ठावंत कार्यकर्ते मात्र सैरभैर झाले आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे पाच आमदार आणि खुद्द प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा असूनही लोकसभेत काँग्रेसचे येथील दोनही उमेदवार पराभूत होत असेल तर पक्षाची एकूण अवस्था काय आहे याची कल्पना येते. नेत्यांनी गटबाजी न रोखल्यास विधानसभेतही याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)