शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

लालबुंद सफरचंद आरोग्यास धोकादायक

By admin | Updated: July 29, 2015 02:35 IST

फळांच्या दुकानातील लालबुंद दिसणारे सफरचंद सर्वांचेच आकर्षण असतात.

विदेशातून आयात : मेणबत्तीच्या घातक रसायनाचे कोटींग यवतमाळ : फळांच्या दुकानातील लालबुंद दिसणारे सफरचंद सर्वांचेच आकर्षण असतात. परंतु हेच आकर्षक सफरचंद मानवी आरोग्यासाठी प्रचंड हानीकारक असल्याचे आढळून आले आहे. अमेरिकेतून आयात होणाऱ्या या सफरचंदावर ते चमकावे (शायनिंग), जास्त दिवस टिकावे म्हणून मेणबत्तीच्या घातक रसायनांचे कोटींग केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फळांच्या बाजारात सफरचंदाला विशेष महत्व आहे. किमान २५० ते ३०० रुपये दराने हे सफरचंद विकले जाते. रुग्णांसाठी ऊर्जावर्धक व आरोग्यास उपयोगी असल्याने डॉक्टरही रुग्णाला अधिकाधिक सफरचंद देण्याचा सल्ला देतात. अशा वेळी गरीब परिस्थितीतही रुग्णाला सफरचंद देण्याचा प्रयत्न त्याच्या नातेवाईकांकडून केला जातो. परंतु हे आयात केलेले लालबुंद सफरचंद रुग्णासाठीच नव्हे तर मानवी आरोग्यास प्रचंड हानीकारक असल्याचे आढळून आले. दारव्हा येथील दिनेश कोठारी या जागरुक नागरिकाने लालबुंद सफरचंद घेऊन ‘लोकमत’ कार्यालय गाठले. त्याने या सफरचंदवर घातक मेणबत्तीचा दिलेला कोट उघडून दाखविला. पाहता पाहता एका सफरचंदवरील ब्लेडने काढलेली खूप मोठी पांढऱ्या रंगाची पावडर गोळा झाली. प्रत्येक सफरचंदमागे ही पावडर खाणाऱ्याच्या पोटात जाते. विशेष असे ती नष्ट होत नसल्याने आणि चिटकून राहत असल्याने आरोग्यास मोठा धोका निर्माण होतो. नेहमी लालबुंद सफरचंद खालल्यास अशा पावडरचा आपसुकच पोटात मोठा गोळा होण्याची शक्यता आहे. धोकादायक असलेल्या या सफरचंदचा प्रवास तपासला असता तो बहुतांश समुद्री मार्गे होत असल्याची माहिती मिळाली. आर्णी रोड स्थित क्वॉलिटी फ्रूट शॉपीचे संचालक अतुल मुक्कावार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, हे लालबुंद सफरचंद आॅस्ट्रेलिया, न्युझीलंड, अमेरिका, चीन या देशातून आयात केले जातात. अमेरिकेतून येणाऱ्या सफरचंदाला वॉशिंग्टन ही ओळख आहे. तर न्युझीलंडमधील सफरचंद रॉयल गाला या नावाने ओळखले जातात. चायना येथील सरफचंद अल्फापॅकर अशा नावाने ओळखतात. हे लाल सफरचंद अमेरिकेतील वॉशिंग्टन या भागात मोठ्या प्रमाणात पिकते. ते आकर्षक दिसावे व दीर्घ काळ टिकावे म्हणून त्यावर मेणबत्ती सारख्या रसायनाचा कोट (थर) चढविला जातो. त्यामुळे ते कायम ताजे व चकाकणारे दिसतात. जहाजातून ते भारतात आणले जातात. वास्तविक अशा केमिकल युक्त वस्तूंना बंदी आहे. मात्र त्यानंतरही बडे फ्रूट व्यापारी व तपासणी यंत्रणेच्या सलोख्याच्या संबंधामुळे हे सफरचंद भारतात ‘एन्ट्री’ मिळवितात. सफरचंदाचा साठा समुद्रात बुडविण्याची होती तयारी काही महिन्यांपूर्वी आयात होणाऱ्या सफरचंदांच्या गुणवत्तेवर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी प्रश्न चिन्ह निर्माण केले होते. त्यानंतर सफरचंदांचा भला मोठा साठा मुंबईतील समुद्रात बुडविण्याची तयारी प्रशासनाने केली होती. मात्र ऐनवेळी व्यापाऱ्यांनी ‘तडजोड’ केल्याने हा वाद मिटला. वादापूर्वी २२०० रुपये दराने विकले जाणारे सफरचंद त्या ‘तडजोडी’नंतर २६०० रुपये दराने विकून ४०० रुपयांची मार्जीन प्रत्येक बॉक्सवर ठेवली गेली होती, अशी माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी) भारतीय सफरचंदाला मोठी मागणी जगातील सर्वात चांगल्या सफरचंदाची निर्मिती भारतात होते. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिर, कुल्लूमनाली, शिमला येथील सफरचंद प्रसिद्ध आहे. चंदीगडच्या सोलर मंडीतून हे सफरचंद देशभरात पाठविले जातात. भारतात निर्मिती होणाऱ्या सफरचंदाचा व्यापार सप्टेंबरला सुरू होऊन फेब्रुवारीपर्यंत चालतो. मार्चपासून विदेशातील सफरचंदाची एन्ट्री होते. ते जुलैपर्यंत चालतात. चीनमधील सफरचंद कमी किंमतीत उपलब्ध होतात.