शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विम्याच्या रकमेतून वसुली

By admin | Updated: June 9, 2017 01:44 IST

नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेकडून शेतकऱ्यांची ५० टक्के विमा रक्कम कर्जस्वरूपात कापण्याचा प्रकार सुरू आहे.

उत्तरवाढोणा : महसूल राज्यमंत्र्यांकडून बँक अधिकाऱ्यांची झाडाझडतीलोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेकडून शेतकऱ्यांची ५० टक्के विमा रक्कम कर्जस्वरूपात कापण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून याबाबतची तक्रार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे करताच त्यांनी गुरुवारी शेतकऱ्यांसह या बँकेवर धडक देवून बँक अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.शेतकऱ्यांच्या विमा रकमेतून कर्जाची वसुली करणाऱ्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक बलजित कुमार यादव व जिल्हा अग्रणी प्रबंधक कैलास कुमरे या दोनही अधिकाऱ्यांना संजय राठोड यांनी एक तास चांगलेच धारेवर धरले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या समोरासमोर मांडल्या. शासनाकडून मिळालेला ५० टक्के पीक विमा यासोबतच शौचालयाचे अनुदान, निराधार अनुदान, घरकुलाचे अनुदान, रोहयोची मजूरी हे सर्व बँक खात्यात जमा झालेले पैसे ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज असेल त्यांच्या खात्यातून परस्पर वसुल करण्याचा प्रताप या बँकेकडून सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बँक अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून यापुढे जर मजूर व शेतकऱ्यांचे अनुदान-पीक विमा परस्पर कापण्यात आला तर सेंट्रल बँकेच्या या शाखेला कुलूप ठोकू अन्यथा शाखा व्यवस्थापकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास लावू, असा इशारा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिला. यावेळी शेतकऱ्यांसोबतच नेरचे नायब तहसीलदार बंड, जिल्हा परिषद सदस्य भारत मेश्राम, निखिल पाटील जैत, वर्षा राठोड, उपसभापती समीर माहुरे, पंचायत समिती सदस्य मधुमती चव्हाण, सरपंच उज्ज्वला बुरड, निरंजन लांजेवार, अनिल चव्हाण आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लाडखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश रणवीर पोलीस ताफ्यासह उपस्थित होते. शेतकऱ्यांना ५० टक्के विमा मिळालेली रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा स्वरूपात ठेवून मागील कर्जाचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी थकित कर्जाचे नुतनीकरण करून दिले तर बँकेकडून वाढीव कर्ज देण्यात येईल.- बलजित कुमार यादव, सेंट्रल बँक शाखा व्यवस्थापक, उत्तरवाढोणा