शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

९४ कोटी रूपयांच्या महसुलाची विक्रमी वसुली

By admin | Updated: May 9, 2017 01:17 IST

महसूल विभागाने वर्षभरात विविध विभागाच्या माध्यमातून ९४ कोटी रूपयांच्या महसुलाची वसुली केली.

उद्दिष्टपूर्ती : शेतकऱ्यांच्या शेतसाऱ्यातून मिळाले ३० कोटीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महसूल विभागाने वर्षभरात विविध विभागाच्या माध्यमातून ९४ कोटी रूपयांच्या महसुलाची वसुली केली. यामध्ये सर्वाधिक ५९ कोटी रूपयांचा महसूल गौण खनिज विभागाने मिळवून दिला आहे. यामुुळे महसूल विभागाला आपली उद्दीष्टपूर्ती करता आली आहे.यावर्षी महसूल विभागाला ८९ कोटी ५० लाख रूपयांच्या महसुलाच्या वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यामध्ये शेतजमिनीचा शेतसारा वसूल करण्यासाठी २५ कोटी ४२ लाख रूपयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ३० कोटी २६ लाख ८५ हजार रूपयांची वसुली केली. ही वसूली ११९ टक्यांच्या घरात आहे. अलिकडील पाच वर्षामध्ये महसूल विभागाला हे उद्दीष्ट प्रथमच पूर्ण करता आले आहे.यासोबतच जिल्ह्यात गौण खनिजाच्या माध्यमातून ५८ कोटी रूपयांच्या महसुलाच्या वसुलीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. यामध्ये डोलोमाईन्स, मुरूम, गिट्टीचा समावेश आहे. खनिकर्म विभागाने आपले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम राबविली. यासोबतच गौण खनिजाच्या चोरांवर दंड आकारला. यामुळे खनिकर्म विभागाला गौण खनिजाचे उद्दीष्ट पूर्ण करता आले आहे. उद्दीष्टापेक्षा अधिक वसुली खनिकर्म विभागाने केली आहे. ही वसुली ५९ कोटींच्या घरात आहे.करमणूक कर विभागाकडे तीन कोटी ८५ लाख रूपयांच्या कर्ज वसूलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. करमणूक कर विभागाने निर्धारित कालावधीत तीन कोटी ८७ लाख रूपयांच्या कर्जाची वसुली केली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या वसुलीचे उद्दीष्ट संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले. यासाठी विशेष मोहीम राबविली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी मोहीम राबविली. यामुळे महसूल विभागाला आपले उद्दीष्ट पूर्ण करता आले. सर्व कर्मचाऱ्यांच्या एकजूटीने हे उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले.- नितीन व्यवहारेउपजिल्हाधिकारी, (महसूल) यवतमाळ