शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रेकॉर्ड ३४ कोटींचे अन् मजुरी साडेअकरा कोटींची

By admin | Updated: July 7, 2014 00:08 IST

झरीजामणी तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे करताना वनाधिकारी आणि कंत्राटदारांनी ३४ कोटींची कामे झाल्याचे रेकॉर्ड तयार केले. त्यामध्ये तब्बल ११ कोटी ५५ लाखांची

कंत्राटदार मोकळेच : झरीचा बहुचर्चित रोहयो घोटाळा सतीश येटरे - यवतमाळझरीजामणी तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे करताना वनाधिकारी आणि कंत्राटदारांनी ३४ कोटींची कामे झाल्याचे रेकॉर्ड तयार केले. त्यामध्ये तब्बल ११ कोटी ५५ लाखांची मजुरीचीच देयके काढण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले. त्यावरून तहसीलदारासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र अद्यापही कंत्राटदारांवर कुठलीच कारवाई झालेली नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत डिसेंबर २०११ ते मार्च २०१२ या कालावधीत झरीजामणी तालुक्यात कंत्राटदार, वन विभागाचे अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमताने कामे करण्याचा सपाटा चालविला. त्यामध्ये तब्बल ३४ कोटी रुपयांच्या कामाचे रेकॉर्ड तयार करण्यात आले. या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून त्यांनी येथील रोजगार हमी योजना कार्यालयाचे अभियंता गुलाबराव भोळे यांच्यामार्फत चौकशी चालविली. शिवाय दारव्हा आणि बाभूळगावचे तत्कालीन तहसीलदार, राळेगाव येथील तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वातील स्वतंत्र तीन समित्यांमार्फत या भ्रष्टाचाराची चौकशी केली. सर्वांच्याच चौकशी अहवालात कंत्राटदार, वनविभागाचे अधिकारी आणि तहसीलदाराच्या संगनमताने या कामांचे रेकॉर्ड तयार करण्यात आले. ते रेकॉर्ड तयार करताना अनेक मृत मजूर या कामांवर राबल्याचे दर्शविण्यात आले. शिवाय मजुरांची केवळ उपस्थिती दर्शवून प्रत्यक्षात ही कामे मशीनने करण्यात आल्याचे पुढे आले. एवढेच नव्हे तर तब्बल ११ कोटी ५५ लाख ४८ रुपयांची मजुरीची देयकेही काढण्यात आल्याचे त्यामध्ये नमूद आहे. ही देयके निघाल्यानंतर जिल्हाधिकारी मुद्गल यांनी तब्बल २३ कोटींची देयके रोखली. त्यामुळे शासनाचा निधी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या घशात जाण्यापासून बचावला. या अहवालाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी झरीचे तत्कालीन तहसीलदार डी.एच. उदकांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एच. मळघणे, ए.ए. शेख, ए.जी. मेत्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून अभियंता भोळे यांनी रितसर तक्रार देऊन संबंधितांविरुद्ध पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अहवालात पांढरकवडाचे तत्कालीन उपवनसंरक्षक डी.बी. श्रीखंडे हे नियंत्रण अधिकारी असताना त्यांनी या भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचाही यामध्ये सहभाग असल्याचे नाकारता येत नसल्याचा ठपका ठेवला आहे. तपासात त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल होणार आहे. मात्र असे असताना एकाही कंत्राटदारावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. वास्तविक मजुरांचे जॉबकार्ड, कामाचे इस्टिमेट आणि इतर बाबी यांची जुळवाजुळव कंत्राटदारांनीच केली होती. पोस्ट आणि बँक कर्मचारी यांना हाताशी धरून मजुरांना त्यांच्या नावे निघालेल्या देयकातील दहा टक्के रक्कम देऊन उर्वरित रक्कम गोळाही त्यांनीच केली होती. त्यामुळे कंत्राटदारांवर गुन्हा नोंद होणे अपेक्षित नव्हे तर बंधनकारक होते. मात्र पाणी कुठे मुरले कुणास ठाऊक. अद्यापही कंत्राटदार मोकळेच आहे.