शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

परिस्थितीवर मात करीत ध्येय गाठा

By admin | Updated: August 8, 2015 02:41 IST

विषम परिस्थितीतही शिक्षण घेवून अनेकांनी यश मिळविले आहे. परिस्थितीवर मात करून ध्येय गाठता येते.

दिलीप चव्हाण : मोफत शिकवणी वर्गाचे उद्घाटन, नाग संघटनेचा पुढाकारयवतमाळ : विषम परिस्थितीतही शिक्षण घेवून अनेकांनी यश मिळविले आहे. परिस्थितीवर मात करून ध्येय गाठता येते. शिक्षणाचे कोणतेही क्षेत्र लहान-मोठे नसते. कोणत्याही शाखेतून शिक्षण घेवून यशाची शिखरं पादाक्रांत करता येते, असे प्रतिपादन जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्था आणि ‘नाग’ संघटना संचालित मोफत शिकवणी वर्गाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. डॉ. सुभाष जमधाडे अध्यक्षस्थानी होते. नगरपरिषद प्राथमिक मुलांची शाळा क्र.५ येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. साहेबराव कदम, पोलीस उपनिरीक्षक राठोड, मोहसीन शेख, प्रा. संजय तामगाडगे, विलास कांबळे, प्रा. प्रशांत जगताप, मनीषा रामटेके आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात दहावीत यश मिळविलेल्या विशाखा खोब्रागडे आणि इतर वर्गातून आदर्श विद्यार्थी ठरलेले प्रतीक शर्मा, अंकित कांबळे, प्रतीक्षा गेडाम, वृषाली घरडे, सानिका डोंगरे यांचा रोख रक्कम देवून सत्कार करण्यात आला. शिकवणी वर्गासाठी सहकार्य करणारे प्रा. प्रशांत जगताप, विलास कांबळे यांना शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविकातून आनंद गायकवाड यांनी शिकवणी वर्गाचा उद्देश सांगितला. कार्यक्रमासाठी रोशनी पुनवटकर, अशोक लोखंडे, सुनील पाईकराव, अमृता अढाऊ, सुरज बोरकर, निखिल मेश्राम, गौतम गोंडाणे, आकाश गायकवाड, सुहास खैरकार, अक्षय भोसले आदींनी पुढाकार घेतला. मोफत शिकवणी वर्गाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे सोपे जाणार आहे. (वार्ताहर)