शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

यवतमाळ शहरात कोरोनाची पुन्हा एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

नेताजी चौक परिसरातील एका कॉम्पलेक्समध्ये वास्तव्याला असलेला ४५ वर्षीय इसम औरंगाबाद येथून परत आला. त्याला सर्दी, ताप, खोकला याचा त्रास होत होता. त्याने शहरातील एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले. डॉक्टरांना संशय आल्याने शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तपासणी केली असता तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

ठळक मुद्देपॉझिटिव्ह रुग्ण : नेताजी मार्केट २८ दिवस बंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात मागील तीन महिन्यांपासून नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येणे बंद झाले होते. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक शांत झाल्याने यंत्रणा व नागरिकांना दिलासा मिळाला होता. बुधवारी औरंगाबाद येथून आलेला इसम कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तो नेताजी चौक परिसरात वास्तव्याला असल्याने हा परिसर पूर्णत: सील केला आहे. शहरात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे.नेताजी चौक परिसरातील एका कॉम्पलेक्समध्ये वास्तव्याला असलेला ४५ वर्षीय इसम औरंगाबाद येथून परत आला. त्याला सर्दी, ताप, खोकला याचा त्रास होत होता. त्याने शहरातील एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले. डॉक्टरांना संशय आल्याने शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तपासणी केली असता तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर प्रशासनाने त्या कुटुंबातील नऊ सदस्यांना धामणगाव रोड स्थित कोविड सेंटरमध्ये हलविले आहे. या सर्वांचीही तपासणी केली जाणार आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण थेट मार्केट परिसरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. नेताजी चौक ते संविधान चौक हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या भागातील बाजारपेठ पुढील २८ दिवस बंद राहणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ही उपाययोजना आवश्यक असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे यांनी सांगितले.रुग्णांचा आकडा झाला २०१जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दोनशेवर पोहोचला आहे. कोरोनाचे अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ४३ आहेत. त्यांच्यावर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डात उपचार सुरू आहे.दारव्हा येथील कोरोनाबाधित मृताच्या कुटुंबीयांचा यवतमाळातील शिंदेनगर भागातील काही नातेवाईकांशी संपर्क आला आहे. नगरपरिषदेने या संपर्काचा शोध घेतला असता तब्बल २१ जणांची यादी तयार झाली आहे. त्या मृताच्या पत्नीची गळाभेट घेतल्याने शिंदेनगरातील दोन कुटुंबांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यांच्यात काही लक्षणे आढळल्यास तपासणी करण्यात येणार आहे. शहरात नव्याने कोरोना संसर्गाची साखळी तयार होते का अशी भीती व्यक्त केली जात आहे. या दृष्टीकोनातून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.अकोल्याच्या वृद्धाचा यवतमाळात कोरोनाने मृत्यूकोरोना संसर्गाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी अकोला येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा यवतमाळातील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांना १५ जून रोजी दाखल करून व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र १७ जूनच्या रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या नऊ इतकी झाली आहे. रुग्ण उशिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचण्यास उशीर होत असल्याने येथील डॉक्टरांना उपचाराकरिता अवधी मिळत नाही. अनेक जण लक्षणे असूनसुद्धा प्रकृती अतिशय बिघडल्यानंतरच शासकीय रुग्णालयाकडे धाव घेत असल्याचा हा परिणाम आहे, असे सांगण्यात येते.यवतमाळ शहरातील हा परिसर होणार सीलनेताजी चौक ते संत सेना चौक, संविधान चौक (बसस्थानक चौक), टीबी हॉस्पिटल, सूचकनगरपासूनचा परिसर सील केला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात अनेक दुकाने येतात. प्रामुख्याने कापड, चप्पल, जनरल स्टोअर्स ही दुकाने आहेत. याशिवाय हा रस्ताही वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे वळण घेऊन वाहतूक सुरू राहणार आहे. पाचकंदील चौकातून, एलआयसी चौक व तेथून पुढे वाहनांना जावे लागणार आहे. या प्रतिबंधित भागात कृषी साहित्य विक्रेत्यांना दुकान उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. पेरणीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांसाठी हा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या