शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतील आघाडीसाठी पुन्हा तारीख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:35 IST

महाविकास आघाडीच्या जागा वटप प्रक्रियेत काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे, अ‍ॅड़ शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रसेकडून मनोहरराव नाईक, शिवेसनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा गटातील जागा वाटपावर कोणाचेच एकमत झाले नाही. पाच जागा असताना आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागांवर दावा केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा गटात खल : महाविकास आघाडीच्या नेत्यांची १४ मार्च रोजी पुन्हा होणार बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे गणित जुळवताना नेत्यांच्या नाकीनऊ येत आहे. आघाडीसाठी रविवारी विश्रामगृहावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र यातून कोणताच निर्णय झाला नाही. आता ठोस निर्णयासाठी पुन्हा १४ मार्चला बसण्याचे ठरविण्यात आले.महाविकास आघाडीच्या जागा वटप प्रक्रियेत काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे, अ‍ॅड़ शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रसेकडून मनोहरराव नाईक, शिवेसनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा गटातील जागा वाटपावर कोणाचेच एकमत झाले नाही. पाच जागा असताना आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागांवर दावा केला आहे. आता माघार कोण घेणार यावर आघाडीचे गणित आहे.तालुका गटासाठी सर्वसाधारण फॉर्म्यूला ठरविण्यात आला आहे. ज्या उमेदवाराकडे मतदार अधिक त्यालाच महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी दिली जाणार आहे. याची जाहीर घोषणा झाली नसली तरी तसे संकेत या बैठकीतून देण्यात आले आहे. मारेगाव व कळंब तालुक्यात काँग्रेस व शिवसेनेच्या इच्छूकांमध्ये ‘टाय’ झाला आहे. मारेगावमध्ये शिवसेनेकडून संजय देरकर तर काँग्रेसकडून नरेंद्र ठाकरे दावा करत आहेत. कळंबमध्ये काँग्रेसकडून बाबू पाटील वानखेडे तर शिवसेनेकडून मोहन राठोड दावेदार आहेत. उमरखेडमध्ये प्रकाश पाटील देवसरकर आणि तातू देशमुख यांच्यात ‘टाय’ झाला आहे. हा पेच सोडविण्याचे आव्हान नेतेमंडळी पुढे आहे. जिल्हा गटात ३६ दावेदार रिंगणात आहेत. महिला गटात दोन जागांसाठी ३९ दावेदार आहे. नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया १७ मार्चपासून सुरू होईल.तिढा जाणीवपूर्वक कायम ठेवण्याचा फंडाजागा वाटपाचा तिढा जाणीवपूर्वक कायम ठेऊन इच्छूकांचा पोळा फुटणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. हा छुपा अजेंडा असून तारीख पे तारीख करत बंडखोरीला वेळ मिळू नये, असा अजेंडा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच महाविकास आघाडीची नेतेमंडळी बैठकीचा रतीब घालत असल्याचे बोलले जात आहे. आता १४ मार्चच्या बैठकीतून काय निर्णय होतो, याकडे लक्ष आहे.

टॅग्स :bankबँक