शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

राठोड बंधूंची भरारी : बोरगाव येथे ऑईल मिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

या भावंडांनी लहानपणापासूनच जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता जोपासली. त्यांनी ठरवलं की, आपण नोकर म्हणून नाही तर मालक म्हणून जगायचं. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे दोघांनाही शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे विश्वजितने स्वत:चे शिक्षण बंद करून मोठ्या भावाच्या अर्थात रंजितच्या शिक्षणासाठी हातभार लावला. त्यासाठी दुसऱ्याच्या चहा टपरीवर, रसवंतीवर, स्टेशनरी दुकानात कामे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : माणसाच्या मनात जिद्द व परिश्रम घेण्याची उर्मी असली की, कोणतीही गोष्ट साध्य करता येते. याची प्रचिती तालुक्यातील बोरगाव येथील राठोड बंधूनी दिली अहे. रंजित आणि विश्वजित या भावंडांनी स्वत: बरोबरच गावातील ३00 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.या भावंडांनी लहानपणापासूनच जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता जोपासली. त्यांनी ठरवलं की, आपण नोकर म्हणून नाही तर मालक म्हणून जगायचं. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे दोघांनाही शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे विश्वजितने स्वत:चे शिक्षण बंद करून मोठ्या भावाच्या अर्थात रंजितच्या शिक्षणासाठी हातभार लावला. त्यासाठी दुसऱ्याच्या चहा टपरीवर, रसवंतीवर, स्टेशनरी दुकानात कामे केली. या कामातून तुटपुंजी मिळकत होत असल्याने कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले होते. अखेर विश्वजितने आपल्या गावी बोरगाव येथे शेतात राबण्यास सुरूवात केली.कापूस वेचणीपासून त्याने शेतातील कामास सुरूवात केली. नंतर गावात मिळेल ती कामे तो करू लागला. चार ते पाच वर्ष दुसºयाकडे शेतीची कामे केली. नंतर दुसऱ्यांची शेती भाडेतत्त्वावर करण्यास सुरूवात केली. त्यात कपाशीची पेरणी करून चांगले उत्पन्न घेतले. कापूस आर्णीत आणून विकला. सोबतच दुसºया शेतकºयांचा कापूसही विक्रीस आणू लागला. यातून त्याचे व्यापाºयांसोबत सलोख्याचे संबंध निर्माण झाले. मग विश्वजितने स्वत:च कापूस खरेदीचा व्यवसाय सुरू केला.या दरम्यान, मोठा भाऊ रंजितचे शिक्षण पूर्ण करून तो पुण्याला नोकरीच्या शोधात गेला. तेथे माहेश्वरी मंडळात त्याल्या नोकरी मिळाली. त्या नोकरीच्या पगारात भागत नसल्यामुळे तो यवतमाळला परत आला. एका फायनान्स कंपनीत काम करू लागला. तेथे तीन-चार वर्षे काम केल्यानंतर रंजितने लहान भाऊ विश्वजित बरोबर काम करायचा निर्णय घेतला.या भावंडांनी कापूस खरेदीचा व्यवसाय वाढवला. त्यातून शेतकºयांची मने जिंकली. नंतर बोरगाव येथेच जिनिंग टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र जागा उपलब्ध नसल्याने स्वप्न साकार होईल की नाही, या काळजीत असताना त्यांना नानाजी लिंगावार, दीपक शामराव पाटील यांनी जागेचा प्रश्न सोडविला. तरुण राठोड बंधूंना त्यांनी उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा दिली. त्या जागी जिनिंगची वास्तू उभी करून राठोड बंधूंनी गावातच कापूस खरेदी सुरु केली. जिनिंगसाठी लागणारी यंत्रे महागडी असल्याने त्यांनी प्रथम भंगारात विकलेल्या मशीन उपयोगात आणल्या.अंगभूत क्षमतांची जाणीवअनेक उद्योग उभारण्याची क्षमता आपल्या अंगी असल्याचे ओळखून राठोड बंधूंनी २०१८ मध्ये गावातच मानुदास आॅइल मिलची सुरुवात केली. या मिलमधून जवळपास ३00 तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. एकेकाळी दुसºयाच्या चहा टपरीवर काम करणाºया राठोड बंधूंनी गावातच स्वत:चा उद्योग उभारून इतरांच्या रोजगाराचा प्रश्न मिटविला. सध्या हे भाऊ ३00 कुटुंबाचे पोषणकर्ते बनले आहे.

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प