ठळक मुद्देवाहतूक ठप्प : ३० आंदोलकांना पोलिसांनी केले स्थानबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्कवणी : विदर्भ जनआंदोलन समितीच्यावतीने सोेमवारी वणीत टोलनाका चौकात रास्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. या मार्गावरील वाहतूक त्यामुळे काही काळ ठप्प होती. यावेळी पोलिसांनी ३० जणांना स्थानबद्ध केले.विदर्भावरील अन्याय दूर करण्यासाठी विदर्भ राज्य वेगळे करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. समितीचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम पाटील, कोअर कमिटी सदस्य रफीक रंगरेज, राहुल खारकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.