शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

बेंबळावर दुर्मिळ सूरय पक्ष्याचा विहार

By admin | Updated: April 18, 2017 00:09 IST

जगभरातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला ‘काळ्या पोटाचा सूरय पक्षी’ यवतमाळनजीक बेंबळा जलायशावर (ता.बाभूळगाव) आढळल्याने ....

लुप्तप्राय सूचित नोंद : परतीच्या स्थलांतरात यवतमाळात मुक्काम यवतमाळ : जगभरातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला ‘काळ्या पोटाचा सूरय पक्षी’ यवतमाळनजीक बेंबळा जलायशावर (ता.बाभूळगाव) आढळल्याने पक्षी अभ्यासकांनी आश्चर्य व्यक्त केले. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन आॅफ नेचर या संस्थेच्या संवर्धनाच्या सूचीमध्ये चिंताजनक (लुप्तप्राय) प्रजाती म्हणून या पक्ष्याचा समावेश आहे, हे विशेष. येथील अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राणीशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण जोशी व सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दीपक दाभेरे यांनी या सूरयची नोंद केली. त्यांच्या निरीक्षणादरम्यान हा पक्षी एकटाच कल्लेदार सूरयच्या थव्यासोबत होता. सर्वसाधारणपणे भारतीय उपखंडातील मोठ्या नद्या व जलाशये, नेपाळ, चीन, बांग्लादेश, थायलंड, कंबोडिया, पाकिस्तान व व्हिएतनाम या देशामंध्ये आढळतो. परंतु, सध्या तो भारत, पाकिस्तान, बांग्लादेश वगळता इतर ठिकाणांहून नामशेष होत आहे. मोठ्या प्रमाणात हिमखंड वितळणे, नद्यांची पाण्याची पातळी वाढल्याने रेतीचे ढिगारे वाहून जाणे या कारणांनी सूरयचे प्रजनन स्थळ नष्ट होते. त्यांची अंडी, नवजात पिलांना शिकारी पक्षी मोठ्या प्रमाणात खातात. अशा या कारणांमुळे सूरय पक्षी दुर्मिळ बनत चालले आहे. डॉ. दाभेरे म्हणाले, फेब्रुवारी ते एप्रिल हा या पक्षाचा प्रजनन काळ आहे. या दरम्यान पोटाचा खालचा व मानेचा भाग गडद काळा दिसतो. त्याची दुभंगलेली लांब शेपटी हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. पाण्यातील लहान मासे, किडे व खवलेदार सूक्ष्मजीव हे या पक्ष्याचे खाद्य आहे. (स्थानिक प्रतिनिधी)यवतमाळात वाढताहेत नोंदी४यवतमाळ जिल्ह्याची पक्ष्यांची पहिली यादी प्रकाशित झाली आहे. त्यात ३१७ पक्ष्यांचा समावेश आहे. परंतु, परतीच्या स्थलांतरादरमान काही दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदी या वर्षभरात झाल्या व त्यात भर पडत आहे. त्यामुळे यवतमाळ पक्षी गणनेमध्ये उच्चांक गाठेल. यासाठी निरंतर पक्षीनिरीक्षणाची गरज आहे, असे मत प्रा. प्रवीण जोशी यांनी व्यक्त केले.