शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात आढळला दुर्मिळ कॉमनरिंग प्लोवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 11:42 IST

भारतीय उपखंडात दुर्मिळ म्हणून गणला जाणारा कॉमनरिंग प्लोवर हा पक्षी यवतमाळलगतच्या बोरगाव धरणावर आढळला.

ठळक मुद्देमोठ्या कंठेरी चिखल्या यवतमाळच्या पक्षीसूचीत आतापर्यंत ३३८ नोंदी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतीय उपखंडात दुर्मिळ म्हणून गणला जाणारा कॉमनरिंग प्लोवर हा पक्षी यवतमाळलगतच्या बोरगाव धरणावर आढळला. अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राणीशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण जोशी व डॉ. दीपक दाभेरे यांनी गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास पक्षीनिरीक्षणादरम्यान त्याची नोंद घेतली.काराड्रीस हायटिकुला कॉमनरिंग प्लोवर असे या पक्ष्याचे शास्त्रीय नाव असून मराठीत त्याला मोठ्या कंठेरी चिखल्या असे म्हटले जाते. बोरगाव धरणावरील ही या पक्ष्याची नोंद यवतमाळ जिल्ह्यातील पहिलीच नोंद असून विदर्भातील दुसरी नोंद आहे. युरोप, आफ्रिका, वेस्ट व नॉर्थ आशिया, नॉर्थ अमेरिकेतून भारतीय उपखंडात येणारा हा दुर्मिळ पक्षी आहे. तो गुजरात, केरळ व पश्चिम बंगाल या समुद्रकिनाऱ्यावर शीतऋतू दरम्यान स्थलांतरित होतो. क्वचित वेळा मार्गस्थ असताना अंतदर्शिय पाणवठ्यावर येतो. त्यामुळे महाराष्ट्रात याची नोंद क्वचितच आहे.या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात या पक्ष्याची नोंद होणे ही घटना महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यवतमाळच्या पक्षी गणनेमध्ये अशा पक्ष्याची नोंद दुर्मिळ आहे. त्यामुळे आम्ही फार आनंदी आहो, असे डॉ. प्रवीण जोशी म्हणाले. यावर्षीच्या नोंदीमध्ये पांढऱ्या पंखांचा काळा सुरयनंतरची ही दुसरी महत्त्वाची नोंद आहे. तसेच कानेल घुबड, युरोपीयन कोरल, बहिरी घुबड, निळ्या गालाचा पाणपोपट, बेलन्सची फटाकडी, काळा कस्तुरी या महत्त्वाच्या पक्ष्याच्या नोंदी यवतमाळात झाल्या. त्यामुळे यवतमाळची पक्षीसूची ३३८ पर्यंत पोहोचली आहे. निरंतर पक्षीनिरीक्षणामुळे यात भर पडेल, असेही मत या दोघांनी व्यक्त केले.

टॅग्स :Bor Damबोर धरण