शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

पेन्शनसाठी आझाद मैदानात कर्मचाऱ्यांनी फुंकली रणदुदुंभी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 05:00 IST

राज्यात १ नोव्हेंबर २००५ या तारखेपासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारली आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांत मृत्यू पावलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही आर्थिक हातभाराशिवाय कसे तरी जगावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन (एनपीएस) या फसव्या योजनेच्या ऐवजी जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, अशी मागणी घेऊन कर्मचाऱ्यांनी राज्यभरात पेन्शन संघर्ष यात्रा सुरू केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केवळ पाच वर्षे सभागृहात बसणारे आमदार-खासदार स्वत:साठी पाच मिनिटांत पेन्शन लागू करून घेतात. मात्र ३५ वर्षे जनतेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा हक्क देत नाही, असा संताप व्यक्त करीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी रविवारी येथील आझाद मैदानात शासनाविरुद्ध रणदुदुंभी फुंकली. जुनी पेन्शन योजना कोणत्याही परिस्थितीत लागू झालीच पाहिजे, या मागणीसाठी मुंबईमध्ये महामोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. राज्यात १ नोव्हेंबर २००५ या तारखेपासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारली आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांत मृत्यू पावलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही आर्थिक हातभाराशिवाय कसे तरी जगावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन (एनपीएस) या फसव्या योजनेच्या ऐवजी जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, अशी मागणी घेऊन कर्मचाऱ्यांनी राज्यभरात पेन्शन संघर्ष यात्रा सुरू केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानातून २२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली आहे. राज्यातील २८ जिल्हे पालथे घालून रविवारी संघर्ष यात्रा यवतमाळात पोहोचली. नेर येथे कॉर्नर सभा आटोपून लोहारा आणि संविधान चौकात भेटी देऊन यात्रेचे संयोजक वितेश खांडेकर, प्राजक्त झावरे पाटील, निमंत्रक मधुकर काठोळे, मिलिंद सोळंके, आशुतोष चौधरी, गोविंद उगले आदींच्या पुढाकारात ही यात्रा आझाद मैदानात उभारलेल्या संत कबीर विचारमंचावर दाखल झाली. या वेळी झालेल्या जाहीर सभेला जिल्ह्यातील शंभरपेक्षा अधिक संघटनांचे सदस्य कर्मचारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.  कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एकच मिशन जुनी पेन्शन, भीक नव्हे हक्क मागतोय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. एकच मिशन असे लिहिलेल्या टोप्या परिधान केलेल्या हजारो कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधून घेतले. गेल्या महिनाभरापासून घरदार सोडून जुन्या पेन्शनसाठी राज्यभर संघर्ष यात्रा काढत असलेल्या पदाधिकाऱ्यांचे यावेळी ग्रामगीता आणि क्रांतिपत्र देऊन स्वागत करण्यात आले. यापुढील काळात प्रत्येक विभागातील कार्यालयातील कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारतील आणि मुंबईच्या अधिवेशनावर महामोर्चा काढला जाईल, असा इशारा देण्यात आला. सभेचे प्रास्ताविक आंदोलन समिती प्रमुख नदीम पटेल, सूत्रसंचालन सुरेंद्र दाभाडकर, आभार श्याम दाभाडकर,    यांनी मानले. 

या पदाधिकाऱ्यांनी उठविला आवाज.. एकच मिशन - संत कबीर विचारमंचावर उपस्थित असलेले वितेश खांडेकर, प्राजक्त झावरे पाटील, मधुकर काठोळे, राजूदास जाधव, मिलिंद सोळंके, अशोक जयसिंगपुरे, नंदकुमार बुटे, मंगेश वैद्य, दिवाकर राऊत, नदीम पटेल यांच्यासह अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन कशी आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच गिरीष दाभाडकर, पप्पू पाटील भोयर, प्रवीण बहादे, सतीश काळे, संजय येवतकर, किरण मानकर, आसाराम चव्हाण, सिद्धार्थ भगत, विलास काळे, दीपिका येरंडे आदींची उपस्थिती होती.

दिवंगत कर्मचाऱ्यांचे नातेवाईक झाले भावूक- कोणत्याही पेन्शनचा आधार नसलेले अनेक कर्मचारी गेल्या १५ वर्षात दगावले. अशा दिवंगत कर्मचाऱ्यांना जाहीर सभेत मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी नातेवाईकांची अवस्था रविवारच्या जाहीर सभेत अत्यंत भावूक झाली होती. - जिल्हा परिषदेचे दिवंगत कर्मचारी गावंडे यांच्या पत्नी निता गावंडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पतीच्या निधनामुळे आपल्या घराची आर्थिक स्थिती हलाखीची झाली असून शासनाने पेन्शन लागू करावी, अशी विनंती केली. 

 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन