शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

पांढरकवडा येथे पहाटे दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:18 IST

येथील शास्त्रीनगरातील एका घरी सहा ते सात दरोडेखोरांनी दरोडा टाकून दीड लाख रुपये रोखेसह नऊ लाख रुपयांचे २४४ ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपती-पत्नीला बांधून ठेवले : सहा ते सात दरोडेखोरांनी लुटला नऊ लाखांचा ऐवज

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथील शास्त्रीनगरातील एका घरी सहा ते सात दरोडेखोरांनी दरोडा टाकून दीड लाख रुपये रोखेसह नऊ लाख रुपयांचे २४४ ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी पती-पत्नीला बेडरुममध्ये बांधून ठेवत तासभर घरात हैदोस घातला.येथील उच्चभ्रू वस्ती असलेल्या शास्त्रीनगरात दिलीप मनोहर गंगशेट्टीवार यांचे घर आहे. येथे मोठा भाऊ राजू उर्फ किशोर आणि ते परिवारासह राहतात. इलेक्ट्रीकल्स वस्तू आणि बोअरवेलचा व्यवसाय आहे. शनिवारी रात्री त्यांची पत्नी अर्चना, मुलगा सोहम व भाचा हर्ष बासटवार बेडरुममध्ये झोपले होते. पहाटे २.३० वाजताच्या सुमारास चार दरोडेखोरांनी किचनचे लोखंडी ग्रील तोडून चौघांनी आत प्रवेश केला. स्वयंपाक घराच्या मागील लाकडी दार सबलीच्या सहाय्याने तोडले व बेडरुमचे दार आतून लावले नसल्याने सरळ आत प्रवेश केला. तोंडाला कापडाने बांधलेल्या दरोडेखोरांनी दिलीप व त्यांच्या पत्नीला उठविले. लाकडी दांडके उगारुन ‘चिल्ला ने का नही, साथ मे पेट्रोल लाये है, सब को जला देंगे, माल कहा है’ असे म्हटले. तसेच तेथे असलेल्या एका टॉवेलचे दोन तुकडे करून दोघांचे हात व तोंड बांधले. त्याच वेळी दिलीपच्या गळ्यातील सोन्याचे चेन, बोटातील अंगठी हिसकावून घेतली. तर पत्नी अर्चनाच्या कानातील एक दागिना काढला असता दरोडेखोराच्या म्होरक्याने साथीदाराला इंग्रजीत ‘डोन्ट टच कुल डाऊन’ असे म्हटले. त्यानंतर अर्चनाने भीतीने गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील बिऱ्या, हातातील अंगठ्या आणि गोफ दरोडेखोरांच्या हवाली केला.त्यानंतर लोखंडी कपाट फोडून त्यात दिलीपच्या वहिनी विद्या गंगशेट्टीवार यांच्या सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची पोत, बांगड्या, पाटल्या, टॉप्स्, बाळमुंडे असा सोन्याचा २४४ ग्रॅम ऐवज तसेच एक किलो वजनाचे चांदीचे ताट, चार वाट्या, एक गडवा तसेच कपाटातील रोख एक लाख २० हजार रुपये लंपास केले. एक तासभर हैदोस घातल्यानंतर दरोडेखोर पसार झाले. त्यानंतर या दोघांनीही आपली सुटका करून घेतली. या प्रकाराची माहिती भाऊ राजू गंगशेट्टीवार यांना सांगितले. त्यानंतर पांढरकवडा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. परंतु थांगपत्ता लागला नव्हता. दरोडेखोर हिंदीतून बोलत होते. सहा ते सातच्या संख्येने असलेल्या दरोडेखोरांच्या हातात लाकडी दांडे व शस्त्रही होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.दरोडेखोर पांढरकवडातील वाहनाने पसारगंगशेट्टीवार यांच्या घराजवळ उभे असलेले मालवाहू वाहन घेऊन दरोडेखोर नागपूरमार्गे पसार झाल्याची माहिती डीवायएसपी अमोल कोळी यांनी दिली. सदर वाहनाचे लोकेशन वडनेर टोल नाक्यावरून मिळाले असून हे वाहन बेला या गावी टाकून चोरट्यांनी तेथून दुसरे वाहन पळवून नेले. या वाहनाने ते नागपूरकडे गेल्याचे त्यांनी सांगितले. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना झाली आहे.