यवतमाळ : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या दृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलचे सदैव प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून रमन विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. नागपूर येथील रमण विज्ञान संस्थेतर्फे एक मोबाईल व्हॅन या शाळेमध्ये दाखल झाली होती. यात विज्ञानासंबंधी २० प्रतिकृती होत्या. यात चुम्बकीय पियानो, आभासी प्रतिमा आदींचा समावेश होता. यवतमाळ पब्लिक स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रतिकृतीचा अभ्यास करून इतर शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. २० वैज्ञानिक उपकरणांचे महत्त्व त्यांना पटवून दिले. महर्षी विद्या मंदिर, जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल, स्कूल आॅफ स्कॉलर्स, चन्नावार विद्यालय आदी शाळांच्या जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. विज्ञान विषय शिक्षक रश्मी दानी आणि धरित्री राऊत यांच्या मार्गदर्शनात वायपीएसच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रतिकृती आणि उपकरणे सादर केली होती. या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले. (वार्ताहर)
‘वायपीएस’मध्ये रमण विज्ञान प्रदर्शन
By admin | Updated: August 10, 2015 02:10 IST