शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

काँग्रेस काढणार विधानभवनावर मोर्चा

By admin | Updated: November 27, 2014 23:42 IST

राज्यात अल्पमतात असलेल्या भाजप सरकारने दुष्काळी स्थितीसाठी कुठल्याही विशेष उपाययोजना केल्या नाही. कमी उत्पादन होवूनही शेतमालाचे भाव वाढलेले नाही. दिलेल्या एकाही

यवतमाळ : राज्यात अल्पमतात असलेल्या भाजप सरकारने दुष्काळी स्थितीसाठी कुठल्याही विशेष उपाययोजना केल्या नाही. कमी उत्पादन होवूनही शेतमालाचे भाव वाढलेले नाही. दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता भाजप सरकारने केली नाही. यासह विविध मुद्यांना घेवून काँग्रेस नागपूरच्या विधानभवनावर मोर्चा काढणार आहे. या आंदोलनाची सुरुवात १ ते ८ डिसेंबर दरम्यान केली जाणार आहे, अशी माहिती मोर्चाचे संयोजक डॉ. नितीन राऊत यांनी पत्रपरिषदेत दिली. १९७२ नंतर भीषण दुष्काळी स्थिती राज्यात उद्भवली आहे. दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला तातडीने कोरडवाहूसाठी हेक्टरी २५ हजार रुपये आणि बागायतीसाठी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. राज्यात पाणी, चारा याची गंभीर समस्या आहे. केवळ हमी भावात ५० रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. धानाचेही दर दोन हजार २०० रुपयांवरून एक हजार ७०० रुपयांवर आणले आहे. सरासरी उत्पन्नात ५० टक्केपेक्षा अधिक घट झाल्यानंतरही सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास तयार नाही. आजही १५१ आमदार त्यांच्या विरोधात आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सूचना केली होती. मात्र प्रत्यक्ष सभागृहात पोलची मागणी करूनही मतदान घेण्यात आले नाही. आवाजी मतदानाच्या काळात सभागृहात झालेले चित्रिकरण सरकारने सार्वजनिक केल्यास त्यांचे पितळ उघडे पडणार आहे. त्यामुळे त्यांनी मागणी करूनही या चित्रिकरणाच्या प्रती उपलब्ध करून दिल्या नाही. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक पॅकेज द्यावे, सरकारने पुन्हा एकदा आपले बहुमत सिद्ध करावे, जवखेडा येथील हत्याकांडाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी या मागण्यांसाठी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. याची सुरुवात १ डिसेंबर रोजी धरणे देवून केली जाणार आहे. ४ डिसेंबरला सर्वत्र लाक्षणिक रास्ता रोको केला जाणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबरला नागपूर येथील विधानभवनावर एक लाखांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे या मोर्चाचे निमंत्रक विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.पत्रपरिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार, विजय खडसे, तातू देशमुख, राहुल ठाकरे, देवानंद पवार, अनिल गायकवाड, अरुण राऊत आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)