कळंब : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढली. संस्थेचे सचिव प्रवीण देशमुख यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आनंदराव जगताप, जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक बाबू पाटील वानखडे, कापूस पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, चिंतामणी देवस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर गोसटवार, गजानन मुके, मुख्याध्यापिका जयश्री गुल्हाने आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. विविध वेशभूषा धारण करून विद्यार्थ्यांनी एकात्मतेचा संदेश दिला. सावित्रीबाई व शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ठाणेदार बी.जी.कऱ्हाळे यांनीही रॅलीला भेट दिली. रॅलीच्या यशस्वीतेसाठी सुप्रिया धनाडे, प्रणोती महाजन, शुभांगी आवारी, भाऊराव हलवले, गायत्री वानखडे, मेघा होले, निवेदिता आमले, वर्षा राऊत, वर्षा भाले, सविता डाफले, सोनाली झोटिंग, सुलभा सहारे, रमा राऊत, स्वाती इंगळकर, सोनू मेंडके, रोहन मानकर, दिनेश वानखडे, झेबा शेख, नीलेश राऊत, दीपक मस्कर आदींनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रॅली
By admin | Updated: January 5, 2017 00:14 IST