शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी एकत्र लढा उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:25 IST

जुन्या पेन्शन योजनेसाठी नव्या आणि जुन्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन उभे केले तरच कर्मचाºयांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र देशमुख यांनी केले. येथील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात आयोजित कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते.

ठळक मुद्देकर्मचारी मेळाव्यात आवाहन : सरकारच्या वेळकाढू धोरणावर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जुन्या पेन्शन योजनेसाठी नव्या आणि जुन्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन उभे केले तरच कर्मचाºयांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र देशमुख यांनी केले. येथील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात आयोजित कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते.यावेळी मंचावर डाक कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव सुनील रोहणकर, महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष सी.डी. भोयर, राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मंगेश वैद्य, सरचिटणिस नंदू बुटे, चंदहास सुटे, देविदास पवार, अशोक दगडे, नदीम पटेल, अ‍ॅड. रमेश पिंपळशेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.आमदार आणि खासदारांची पेन्शन रद्द करण्यासाठी लढा उभा करण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी डॉ.देशमुख यांनी नोंदविले.अ‍ॅड. रमेश पिंपळशेंडे म्हणाले, या देशाची लूट लोकप्रतिनिधींनी केली. आमदारांना प्रश्न विचारले पाहिजे. आपली जात, धर्म, प्रश्न एकच आहे. संघटितपणे पुढे आले तरच प्रश्न सुटेल, असे ते म्हणाले. यावेळी मान्यवरांनी सरकारच्या वेळकाढू धोरणावर सडकून टीका केली. जुन्या पेन्शन योजनेसाठी मोठा लढा लढण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.संपाची रणनीती मुंबईत ठरणारराज्य सरकारी आणि निमशासकीय १९ लाख कर्मचारी ७, ८ व ९ आॅगस्ट असे तीन दिवस संपावर आहे. या संपकाळातील रणनीती ठरविण्यासाठी सोमवार ६ आॅगस्टला मुंबई येथे बैठक बोलविण्यात आली. यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.५४ दिवस संपात सहभागीतांचा सत्कार१९७७-७८ मध्ये राज्य कर्मचाऱ्यांनी ५४ दिवसांचा संप केला होता. या संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांना कारागृहात टाकण्यात आले होते. यानंतरही संप यशस्वी झाला. या संपात त्यावेळी सहभागी झालेले वसंत कासार यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली.