शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी, शेतकरी चिंतेत

By admin | Updated: August 24, 2016 01:09 IST

सोयाबीन ऐन फुलोऱ्याच्या स्थिती असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

डोळे आकाशाकडे : सोयाबीन, कापूस करपू लागले, सिंचनासाठी धडपड पुसद : सोयाबीन ऐन फुलोऱ्याच्या स्थिती असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गत २४ दिवसांपासून पाऊ नसल्याने शेतातील सोयाबीन, कापूस, तूर पिकाने माना टाकल्या आहेत. एक-दोन दिवसात पाऊस आला नाही तर त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. पुसद उपविभागात यंदा सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकऱ्यांनी पेरणी केली. पीक जोमात वाढू लागले. परंतु आता २४ दिवसांपासून उपविभागात पावसाने दडी मारली आहे. बहरलेला खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुटली असून, पिके माना टाकत आहे. खडकाळ जमिनीतील पिके वाळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पूर्वी कपाशीतून उत्पन्न मिळविणारा तालुक्यातील शेतकरी नगदी पीक असलेल्या सोयाबीनकडे वळला आहे. कपाशीचा लागवड खर्च वाढला आहे. कीड नियंत्रणासाठी मोठी दमछाक होते. त्यामुळे शेतकरी सोयाबीनकडे वळले आहे. तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे क्षेत्र दिसत आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने पीक माना टाकत आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी ओलित करीत आहे. परंतु ८० टक्के शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या तीन-चार दिवसात पाऊस न झाल्यास खरिपाची पिके हातून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गत वर्षी खरिप हंगामाने शेतकऱ्यांना दगा दिला. यावर्षी पिकांची स्थिती चांगली आहे. परंतु आता पावसाची आवश्यकता असताना पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतीची कामे आटोपली असून, आता पावसाची नितांत गरज असल्याचे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण पुलाते यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)