शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

२६३ इमारतींतच रेन वॉटर हार्वेस्टिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:32 IST

वाढत्या शहरीकरणाने सिमेंटचे जंगल तयार झाले आहे. भूगर्भातील पाणी पातळी यामुळे झपाट्याने कमी होत आहे. तर पावसाचे पाणी थेट वाहून जात आहे. शहरांमध्ये सर्वत्र काँक्रीटीकरणाने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर पर्याय म्हणून छतावरचे पाणी जमिनीत मुरविणे हा आहे.

ठळक मुद्देयवतमाळ शहर : ७५ हजार इमारतींवर प्रश्नचिन्ह, केवळ कागदावरच उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाढत्या शहरीकरणाने सिमेंटचे जंगल तयार झाले आहे. भूगर्भातील पाणी पातळी यामुळे झपाट्याने कमी होत आहे. तर पावसाचे पाणी थेट वाहून जात आहे. शहरांमध्ये सर्वत्र काँक्रीटीकरणाने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर पर्याय म्हणून छतावरचे पाणी जमिनीत मुरविणे हा आहे. मात्र कठोर कायदेशीर तरतूद असूनही यवतमाळात रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेच जात नाही. याचे नगरपरिषद व नगररचना विभागालाही कोणतेच सोयरसूतक नाही. चिरीमिरी दिली की सोईच्या पद्धतीने बांधकाम परवानगी मंजूर केली जाते. यामुळेच शहराचे वाळवंट होण्याची स्थिती आहे.नगरपरिषदेच्या सर्व्हेक्षणातूनच हा गंभीर प्रकार पुढे आला आहे. शहरातील २६३ इमारतीतच रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे. उर्वरित ७५ हजार इमारतींमध्ये कुठेही पावसाच्या पाण्याचे नियोजन होताना दिसत नाही. नगरपरिषदेने नव्याने बांधकाम परवानगी दिलेल्या २ हजार ३७० इमारतीचे सर्व्हेक्षण केले. त्यातील केवळ २६३ इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग झाल्याचे निदर्शनास आले आहे. याला पालिकेचा नगररचना व बांधकाम विभागाच पूर्णत: जबाबदार असल्याचे स्पष्ट होते. काही संघटना याबाबत जनजागृती करीत आहे. त्यानंतरही अनेक व्यावसायिक व शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेले नाही.नगरपरिषद यंत्रणेचे दुर्लक्षपाणीटंचाईपासून यवतमाळकर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी जागरुक आहे. यापूर्वी ज्यांनी घर बांधले. त्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक होते. हे काम पार पडले अथवा नाही याची पाहण्याची संपूर्ण जबाबदारी नगर रचना विभाग आणि नगरपरिषदेच्या अभियंत्यांची आहे. असे असले तरी याकडे नगर परिषद यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. - कांचन चौधरी, नगराध्यक्षनागरिक स्वत:च पुढाकार घेतातइमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग होत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. अलिकडच्या काळात नागरिकांमध्ये जागरुकता वाढत आहे. इमारत बांधताना घर मालक स्वत: रेन वॉटर हार्वेस्टिंगचा आग्रह करतात. यामुळे नवीन इमारतींमध्ये अलिकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे स्ट्रक्चर तयार केले जात आहे. बोअरवेल आणि विहिरींच्या बाजूला असा प्रयोग केला जातो. यामुळे पुढील काळात जलपुनर्रभरण वाढेल. - छडानंद राजूरकर, माजी नगररचनाकारअसे केले जाते जल पुनर्भरणपावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात. तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दंव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी

टॅग्स :Rainपाऊस