शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुसद उपविभागात पावसाने गाठली वार्षिक सरासरी

By admin | Updated: August 3, 2016 01:33 IST

पुसद उपविभागात यंदा पावसाने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच वार्षिक सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे.

महागावात सर्वाधिक : पिके पिवळी पडण्याचा धोका पुसद : पुसद उपविभागात यंदा पावसाने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच वार्षिक सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे. महागाव तालुक्यात तर वार्षिक सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला. अति पावसाने शेत तळे झाले असून पिके पिवळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. पुसद उपविभागातील पुसद, उमरखेड, महागाव आणि दिग्रस तालुक्यात दररोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरुन वाहत असून बहुतांश प्रकल्प ओव्हर-फ्लो झाले आहे. महागाव तालुक्यात तर यंदा अतिवृष्टी झाली आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी ५५८.४० मिमी आहे. आतापर्यंत या तालुक्यात ९१४ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजे वार्षिक सरासरीच्या १०६.४८ टक्के पाऊस कोसळला. गतवर्षी याच कालावधीत केवळ २७३ मिमी पावसाची नोंद झाली होती. या पावसामुळे तालुक्यात हाहाकार उडाला आहे. अनेक नदी-तीरावरील शेतात पाणी शिरले असून अनेकांची शेती खरडून गेली आहे. तर काही गावांमध्ये शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. पिके पिवळी पडत आहे. पुसद तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ९१.४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी ७९० मिमी आहे. आतापर्यंत तालुक्यात ७२३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३५३ मिमी पाऊस कोसळला होता. अशीच अवस्था उमरखेड तालुक्याचीही आहे. उमरखेडमध्ये वार्षिक सरासरीच्या ७५.३७ टक्के पाऊस कोसळला असून आतापर्यंत ६८३ मिमी पाऊस कोसळला आहे. दिग्रस तालुक्यात ८६.५२ टक्के पाऊस कोसळला असून या तालुक्याची वार्षिक सरासरी ८२१.८० मिमी आहे. आतापर्यंत तालुक्यात ७११ मिमी पाऊस कोसळला आहे. दिग्रस, पुसद, उमरखेड आणि महागाव या तालुक्यात दररोज पाऊस कोसळत आहे. यापावसामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. गत तीन वर्षांपासून कोरड्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. आता पाऊस कधी थांबतो याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. (लोकमत चमू) शेतांना आले तळ्याचे स्वरूप अतिपावसामुळे पिके पिवळी पडू लागली आहे. जमिनीतील पोषक मुलद्रव्य अतिपावसाने झाडांना मिळत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतात पाण्याचे तळे साचले असून विहिरीही ओव्हर फ्लो झाल्या आहे. शेतकरी आता पावसाला विश्रांती घे असे म्हणत आहे. मात्र दररोज ढगाळी वातावरण आणि पावसाची रिमझीम सुरू आहे. महागाव तालुक्यातील टेंभुरधरा येथील शेतात पाणी साचले असून पीक पूर्णत: खरडून गेले आहे. कृषी विभागाने या परिसराची पाहणीही केली आहे.